आक्षेपार्ह पत्रके वाटून समाजामध्ये तेढ निर्माण करणारा गजाआड
नाशिक : पुढारी वृत्तसेवा – दोन समाजांंत तेढ निर्माण होईल असा आक्षेपार्ह मजकूर लिहिलेले पत्रक छापून पंचवटी परिसरातील राजवाडा भागातील घरांमध्ये वाटप करणाऱ्या संशयित अमोल चंद्रकांत सोनवणे (३७, रा. पंचवटी) याला न्यायालयाने गुरुवार (दि. २७)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. पोलिसांच्या प्राथमिक तपासात आक्षेपार्ह पत्रक संशयिताने स्वत: लिहिले असून, त्यानेच ते छापल्याचे समोर येत आहे. पंचवटी परिसरात शनिवारी …
लाचखोर मनपा सहाय्यक आयुक्तांच्या घरझडतीत 20 लाखांचे घबाड जप्त
मालेगाव (नाशिक) : पुढारी वृत्तसेवा – येथील महापालिका क्षेत्रातील गटार कामाचे देयके (बिल) मंजूर करुन त्यापोटी चार टक्के प्रमाणे संबंधित ठेकेदाराकडून 33 हजार रूपयांची लाच स्विकारल्याप्रकरणी शुक्रवारी (दि.21) सायंकाळी मनपा आयुक्तांचे स्वीय सहाय्यक तथा मनपाचे सहाय्यक आयुक्त सचिन सुरेंद्र महाले (51, रा. वर्धमाननगर, कॅम्प) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. त्यांच्याविरूद्ध किल्ला पोलिस ठाण्यात लाचलुचपत …
एमडीबाबत दोन दिवसांत दुसरी कारवाई; 3 लाखांचा साठा जप्त
नाशिक : पुढारी वृत्तसेवा – एमडी विक्री करण्यासाठी आलेल्या संशयिताला गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने पकडले. शहबाज मजिद पठाण (२७, रा. खडकाळी) असे या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून सुमारे तीन लाख रुपयांचा एमडी साठा जप्त केला. गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने रविवार कारंजा परिसरात बुधवारी (दि. १९) सापळा रचून दोन युवकांना पकडले होते. त्यांच्याकडून ३२ ग्रॅम वजनाचा …
आक्षेपार्ह पत्रकाचे वाटप; दिंडोरी नाका परिसरात रास्ता रोको
नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क – पंचवटी परिसरात शनिवार (दि.२२) रेाजी पहाटेच्या सुमारास एका समाजाच्या विरोधात आक्षेपार्ह पत्रक वाटल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे ज्या समाजाविरोधात आक्षेपार्ह पत्रक वाटण्यात आले आहेत. त्या संबंधित संपूर्ण समाज रस्त्यावर उतरला आहे. त्यामुळे दिंडोरी नाका परिसरात रास्ता रोको सुरू असून अनेक ठिकाणी दुकाने बंद करण्यात आली आहे. …
फ्लॅटधारक महिलेची फसवणूक करीत तिघांनी मागितली खंडणी
नाशिक : पुढारी वृत्तसेवा – फ्लॅट खरेदीच्या बहाण्याने फ्लॅटधारक महिलेची फसवणूक करीत तिच्याकडून १० लाख रुपये घेतल्याप्रकरणी, तसेच बनावट कागदपत्रांच्या आधारे व्यवहार करण्याचा प्रयत्न करत दोन वकिलांसह इतर तिघांनी २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात नाशिक बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. वैभव शेटे यांच्यासह ॲड. सुभाष बोडके व इतर …
जातेगाव डोंगरावरील हत्येचा 24 तासांत उलगडा
नांदगाव : पुढारी वृत्तसेवा – जातेगाव येथील पिनाकेश्वर महादेव डोंगर परिसरात सोमवारी (दि.१७) आढळलेल्या संशयास्पद मृतदेहाचा तपास करताना मोठ्या कटाचा उलगडा झाला आहे. मुंबई महापालिकेतील लिपिकाचा अनैतिक संबधांच्या त्रांगड्यातून पत्नी, मेहुणी, तिचा मुलगा, साडू यांनीच खून केल्याचे निष्पन्न झाले असून, नांदगाव पोलिसांनी २४ तासांत सहापैकी चार संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या १७ तारखेला मुंबई मनपाचे …
सीसीटिव्हीत प्रेट्रोल चोरटा कैद; इंधनावर डल्ला वाढतोय
सिडको (नाशिक) : पुढारी वृत्तसेवा – जुने सिडको भागात आता रात्री घरासमोर पार्किंग केलेल्या दुचाकीतून पेट्रोल चोरुन नेण्याचे प्रमाण वाढले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती १०० रुपयांवर असल्याने आता चोरट्यांनी चक्क गाड्यांमधील इंधनावर डल्ला मारण्याचे काळे धंदे सुरु केले आहे. विशेष म्हणजे परिसरातील व्हाईट कॉलर तरुणच इंधनचोरी करु लागल्याने वाहने आता कुठे लपवायची, असा प्रश्न …
‘त्या’ रिक्षाचालकाचे मारेकरी मित्रच; चार संशयित गजाआड
नाशिक : पुढारी वृत्तसेवा – मेरी-रासबिहारी लिंकरोडवर औदुंबर लॉन्सजवळील मोकळ्या जागेत प्रशांत अशोक तोडकर (२८, रा. आदर्शनगर, रामवाडी) या रिक्षाचालकाचा खून झाला. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने तपास करीत पिंपरी चिंचवड परिसरातून चार संशयितांना अटक केली. मित्रांनीच शाब्दिक वादातून प्रशांतचा खून केल्याचे समोर येत आहे. विजय दत्तात्रय आहेर (३०, रा. रामवाडी), संकेत प्रदीप गोसावी …
अल्पवयीन मुलीशी लग्न; पतीसह चौघांवर गुन्हा दाखल
सिडको (नाशिक) : पुढारी वृत्तसेवा – इन्स्टाग्रामवरून ओळख निर्माण करून अल्पवयीन मुलीशी विवाह करून तिला गरोदर केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इन्स्टाग्रामवरून झाली होती ओळख अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही संबंध ठेवले त्यानंतर विवाह करुन पिडीतेला गरोदर केले. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडित विवाहिता ही अंबड परिसरात राहते. आरोपी पतीने …
दुकानातून २८ हजार रुपयांचे कपडे चोरणारे गजाआड
नाशिक : पुढारी वृत्तसेवा – खरेदीच्या बहाण्याने दुकानातून कपडे चोरून पळ काढणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने पकडले. चोरलेले कपडे दोघांकडून हस्तगत करण्यात आले. मोहंमद अन्वर सय्यद (२९, रा. नानावली) व प्रवीण उर्फ चापा लिंबाजी काळे (२४, रा. कॅनॉल रोड) अशी या संशयितांची नावे आहेत. कॉलेज रोडवरील कॅन्टाबिल शोरूममध्ये दि. २५ मे रोजी दोन चोरटे …