जळगाव : कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात शिवसेना आक्रमक

अब्दुल सत्तार

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेल्या वक्तव्यांचा शिवसेनेच्या (ठाकरे गट) अल्पसंख्यांक आघाडीकडून निषेध करण्यात आला. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या इमारतीसमोर बोंबाबोंब आंदोलन केले. शिवसेनेकडून महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीसमोर कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध आंदोलन करण्यात आले.

याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगर प्रमुख शरद तायडे, अल्पसंख्याक महानगर आघाडी प्रमुख जाकीर पठाण, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, उपमहानगर प्रमुख गणेश गायकवाड, फरीद खान, पिंटू सपकाळे, शिवसेना अल्पसंख्याक महानगर प्रसिद्धी प्रमुख इक्बाल शेख, शकील बागवान, शोएब खाटीक डॉ. जुबेर युनूस शेख, बाळा कंखरे, अंकुश कोळी, आबिद खान, अरबाज पटेल, सोनू पठाण,इमरान भिस्ती, मतीन सय्यद, अमन भाई, मोहीन शेख, आसिफ शाह, आसिफ शेख, अरबाज शाह, आफताब मिर्झा, तलीफ सय्यद आदी उपस्थित होते.

मंत्री सत्तार यांना जिल्ह्यात पाय ठेऊ देणार नाही : विष्णू भंगाळे

जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी मंत्री सत्तार यांच्यावर टीका करत त्यांना जिल्ह्यात फिरू देणार नसल्याचा इशारा दिला. अब्दुल सत्तार हे राज्याचे कृषिमंत्री असले तरी त्यांना शेतकऱ्यांच्या समस्या अशी काही एक देणे घेणे नाही. केवळ वायफळ बोलण्यात त्यांना रस दिसून येत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना पक्षात प्रवेश देऊन मंत्रीपद दिले. मात्र अब्दुल सत्तार केलेल्या उपकारांची जाण न ठेवता, शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांची माफी मागावी. अन्यथा त्यांना जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा विष्णू भंगाळे यांनी दिला आहे.

हेही वाचलंत का?

The post जळगाव : कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात शिवसेना आक्रमक appeared first on पुढारी.