जिल्हा युवक महोत्सव : स्वररंगात कलागुणांची मुक्त उधळण

युवक महोत्सव www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जिल्हास्तरीय ‘स्वररंग-2022’ युवक महोत्सवात जिल्ह्यातील 50 महाविद्यालयांमधील 1,200 विद्यार्थ्यांनी बहारदार कलाविष्कारांचे सादरीकरण करत उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळ व मविप्र संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘स्वररंग-2022’ महोत्सवाचे रावसाहेब थोरात सभागृहात मविप्र संस्थेचे उपसभापती देवराम मोगल यांच्या हस्ते पार पडले. व्यासपीठावर संचालक अ‍ॅड. लक्ष्मण लांडगे, सेवक संचालक डॉ. एस. के. शिंदे, शिक्षणाधिकारी डॉ. नितीन जाधव, डॉ. विलास देशमुख, डॉ. संतोष परचुरे, प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड, परीक्षक शंकरराव वैरागकर, अविराज तायडे, सविता ताडगे, हेमांगिनी जोशी, सायली पानसे, दिनेश संन्यासी, नितीन गरुड, योगेश बोर्‍हाटे, शंतनू गंगाखेडकर आदी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. गायकवाड यांनी प्रास्ताविकात विद्यार्थी विकास मंडळ राबवत असलेल्या 18 योजनांची माहिती दिली. कला मंडळप्रमुख डॉ. तुषार पाटील यांनी सूत्रसंचालन, तर विद्यार्थी विकास अधिकारी व युवक महोत्सव समन्वयक डॉ. गणेश मोगल यांनी आभार मानले.

तब्बल 35 कलाप्रकारांमध्ये स्पर्धा : 
सुगम संगीत व गायन, शास्त्रीय गायन, तालवाद्य वादन, पाश्चिमात्य- वैयक्तिक व समूह गीतगायन, लोक वाद्य वृंद, नृत्य- वैयक्तिक व समूह, लोकनृत्य, शास्त्रीय नृत्य, अभिनय-एकपात्री, एकांकिका, प्रहसन, मूकनाटक, नकला, प्रश्नमंजूषा, वक्तृत्व स्पर्धा, वाद-विवाद स्पर्धा, चित्रकला, रांगोळी, मेंदी, माती कला यांसारख्या तब्बल 35 कलाप्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी बहारदार सादरीकरण केले.

हेही वाचा:

The post जिल्हा युवक महोत्सव : स्वररंगात कलागुणांची मुक्त उधळण appeared first on पुढारी.