अटक

नाशिक : सातपूरमधील श्रमिक नगर व कार्बन नाका परिसरात धारदार शस्त्रांसह गुन्हे शाखा युनिट दाेनच्या पथकाने व सातपूर पोलिसांनी दोन संशयित ताब्यात घेतले आहे. गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने योगेश विश्वनाथ शिंदे (३८, रा. श्रमिक नगर) या संशयितास पकडले आहे.

पोलिस अंमलदार प्रविण वानखेडे यांच्या फिर्यादीनुसार, मंगळवारी (दि.२९) सांयकाळी पाचच्या सुमारास योगेश यास चॉपर व तलवारींसह ताब्यात घेतले. तर सातपूर पोलिसांनी संशयित राहिल नुरुद्दीन सैय्यद (१९, रा. शिवाजीनगर) यास कार्बन नाका परिसरातून मंगळवारी (दि.२९) मध्यरात्री धारदार शस्त्रासह सातपूर पोलिसांनी ताब्यात घेतले. दोघांविरोधात सातपूर पोलिस ठाण्यात संशयित योगेश व राहिल विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक क्राईम : धारदार शस्त्रांसह दोघे ताब्यात appeared first on पुढारी.