
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
भगूर येथील स्वा. सावरकर यांच्या जन्मभूमी स्मारकात नि:स्वार्थ सेवा करत सावरकरांनी रचलेल्या विविध गीतांचे सादरीकरण करणारे बागेश्री वाद्यवृंदाचे संचालक व नाट्यसमीक्षक चारुदत्त दीक्षित यांचा राज्याचे पर्यटन विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते सत्कार करून कलेचा गौरव करण्यात आला.
गेली २९ वर्षे अखंडितपणे बागेश्री वाद्यवृंदातर्फे जवळपास ७५० पेक्षा अधिक उद्योन्मुख गायक-वादक कलाकारांना सावरकरांच्या स्मारकात गायनाची संधी उपलब्ध करून दिली. एकनाथ शेटे, डॉ. मृत्युंजय कापसे, विलास कुलकर्णी, स्व. रामदास आंबेकर, गायक राजेंद्र सराफ, तबलावादक सुधीर करंजीकर, दीपक दीक्षित यांचे सहकार्य लाभले. सत्काराला उत्तर देताना चारुदत्त दीक्षित यांनी कृतज्ञता व्यक्त केली. या विधायक उपक्रमाबद्दल संगीतकार व गायक पं. हृदयनाथ मंगेशकर, रणजित सावरकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तत्कालीन केंद्रीय संरक्षण व गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनीदेखील चारुदत्त दीक्षित यांना शुभेच्छा दिल्या होत्या.
हेही वाचा:
- खडकवासलातून शेतीला उन्हाळी आवर्तन
- पारगाव : मेंढपाळांनी घेतला नदीकाठचा आसरा
- उंडवडी : चार्यासाठी मेंढपाळांची भटकंती
The post नाशिक : गायनकलेच्या सेवेबद्दल मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते चारुदत्त दीक्षित यांचा सत्कार appeared first on पुढारी.