नाशिक : वणी-बोरगाव-सापुतारा मार्गावर पिकअप झाडावर आदळली; तीनजण ठार

नाशिक, पुढारी वृत्तसेवा :  वणी-बोरगाव-सापुतारा महामार्गावर शनिवारी पहाटे तीन वाजण्याच्या दरम्यान नैताळे येथून शेतमजूर पिकअपने गुजरातकडे जात होते. दरम्यान, हिरडपाडा (ता.सुरगाणा) येथील वळणावर वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअप वडाच्या झाडावर आदळली. या अपघातात ३ जण जागीच ठार झाले. तर १३ जण जखमी झाले आहेत.

पिकअप वाहनातील जखमींना तात्काळ बोरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. प्राथमिक उपचारानंतर त्यांना गुजरात मधील शामगव्हाण येथे दाखल करण्यात आले आहे. तर दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अहवा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना समजताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हेही वाचंलत का?

The post नाशिक : वणी-बोरगाव-सापुतारा मार्गावर पिकअप झाडावर आदळली; तीनजण ठार appeared first on पुढारी.