
नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
विडी कामगार आईने दिलेले बाळकडू घेत घरात ज्येष्ठ मुलगी असलेली प्रतिमा यादव मुंबई पोलिस दलात दाखल झाली आहे. प्रतिमाची मेहनत, कुटुंबाचे संस्कार व शिक्षकांनी दिलेले पाठबळ तिच्यासाठी लाख मोलाचे ठरले आहे.
सिन्नरच्या पूर्व भागातील निर्हाळे येथील साबळे-वाघिरे (संभाजी विडी) या विडी कारखान्यातील कामगार मीना यादव व फोटोग्राफर वडील संतोष यादव यांची ज्येष्ठ कन्या प्रतिमा ही लहानपणापासूनच आईबरोबर कष्टाची कामे करत असत. आई मीना विड्या वळून मिळणार्या पगारातून कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि प्रतिमाच्या शिक्षणाचा खर्च करत होती. त्यातूनच तिचे शिक्षण दहावीपर्यंत निर्हाळे माध्यमिक विद्यालयात झाले. वडील संतोष यादव यांनी सिन्नर येथील एका प्रशिक्षण संस्थेत तिचा प्रवेश घेतला व कॉलेजही सुरू ठेवले. आईला घरकामात मदत, विड्या वळण्याच्या कामापासून ते कधी कधी आईबरोबर शेतमजुरी करण्यासाठी जात असे.
कुटुंबीयांचे पाठबळ ठरले मोलाचे!
आजी, आई-वडील, काका सोमेश्वर, चुलते गणेश आणि शिक्षक आदींचे सहकार्य मिळाले असल्याचे प्रतिमा यादव हिने सांगितले.
हेही वाचा:
- आमदार बच्चू कडूंना मंत्री दर्जा; विस्तार लांबणीवर?
- पुणे : पालखी सोहळ्याच्या नियोजनाची आज आढावा बैठक
- कुटुंबाचा `उत्तम` आधार हरपला; सौंदलग्यातील युवकाचा डोक्यावर पाईप पडल्याने मृत्यू
The post नाशिक : विडी कामगाराची मुलगी मुंबई पोलिसात दाखल appeared first on पुढारी.