सिडको; पुढारी वृत्तसेवा : नाशिकची निवडणूक शिवसेना विरुद्ध शिवसेना नसून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना विरुद्ध गद्दार यांच्यात आहे. भाजपला ‘चारशे पार’चा नारा लावून देशात हुकूमशाही आणायची आहे व संविधान बदलायचे आहे, असे सांगत उबाठा गटाचे युवासेना प्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी (दि.१७) भाजपावर निशाणा साधला.
तसेच राज्यातील उद्योग गुजरातला पळवून बेरोजगार युवकांची फसवणूक सरकारने केली आहे. शेतकरी शेताला भाव मागतात तर अटक केली जाते, या अन्यायाच्या विरोधात लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीचे उमेदवाराला विजयी करा, असेही आवाहन आमदार आदित्य ठाकरे यांनी केले. नाशिक लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ पवननगर येठे जाहीर सभेत ते बोलत होते.
यावेळी पक्षाचे उमेदवार राजाभाऊ वाजे, जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख विलास शिंदे, माजी महापौर विनायक पांडे, माजी महापौर यतिन वाघ, डि.जी.सुर्यवंशी, माजी आमदार वसंत गिते, आमदार नरेंद्र दराडे, उपजिल्हाप्रमुख सचिन मराठे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा :