राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतल्याने धुळ्यात जल्लोष

शरद पवार

धुळे, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा आज मागे घेतला आणि परत सक्रिय होणार असे आज जाहीर केले. या घोषणेनंतर धुळे शहरांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी जल्लोष करुन आनंदात स्वागत केले. धुळे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते व पदाधिकाने शहर जिल्हाध्यक्ष रणजीत भोसले यांच्या नेतृत्वाखाली जल्लोष केला. पेढे भरून, एकमेकांना पेढे भरून व फटाके फोडून आनंद साजरा केला. नागरिकांना सुद्धा पेढे वाटून आनंदामध्ये सहभाग करून घेतला घेतले.

शरद पवार यांच्या नेतृत्वामध्ये जोमाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम करू ,विविध जाती धर्मातील तरुणांना एक संघ करून संघटन वाढवू,  असा निश्चय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी केला. यावेळी रणजीत भोसले,संजय माळी, राजेंद्र सोळंके, गोरख शर्मा, महेंद्र शिरसाट, डी. टी. पाटील, दानिश पिंजारी, दीपक देसले, रामेश्वर साबळे, हेमंत पाटील, भूषण पाटील, गोलू नागमल, संदीप पाटील, निलेश चौधरी, स्वामिनी पारखे, सोनू कोळी, एजाज शेख,अमित शेख, सोनू घारू, शोएब अन्सारी, नजीर शेख यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचंलत का?

The post राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतल्याने धुळ्यात जल्लोष appeared first on पुढारी.