नाशिकला विजयाची हुलकावणी; राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा

Match Fixing Report : मॅच फिक्सिंगबाबत मोठे गुपित उघड! 2022 मध्ये 13 क्रिकेट सामने झाले फिक्स?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय १६ वर्षांखालील वयोगटातील आमंत्रितांच्या अव्वल क्रिकेट स्पर्धेचे (एमसीए इन्व्हिटेशन सुपर लीग) सामने खेळविले जात आहेत. एमसीएडब्ल्यूविरुद्ध नाशिकला विजयाची हुलकावणी मिळाली. शेवटच्या तासात अतिशय रंगतदार झालेल्या या सामन्यात अखेर नाशिकवर पहिल्या डावातील आघाडीचे गुण घेत एमसीएडब्ल्यूने स्पर्धेत चुरस निर्माण केली.

प्रथम फलंदाजी करत नाशिकने पहिल्या डावात सर्वबाद १८१ धावा केल्या. नाशिककडून अर्णव तांबटने सर्वाधिक ४६ व नील चंद्रात्रेने २४ धावा केल्या. कर्णधार यशराज मदाने व आर्य मोनेने प्रत्येकी ३ गडी बाद केले. एमसीएडब्ल्यूने पहिल्या डावात २३६ धावा करत नाशिकवर आघाडी घेतली. आर्य मोरेने नाबाद ६६ व राम राठोडने ४० धावा केल्या. नील चंद्रात्रेने ४ व कौस्तुभ रेवगडेने ३ गडी बाद केले. दुसऱ्या डावात नाशिकने १५६ धावा केल्या. ऋग्वेद जाधवने ४८ धावा केल्या. यशराज मदाने व साईराज जोशीने प्रत्येकी २ गडी बाद केले. एमसीएडब्ल्यूला निर्णायक विजयासाठी १६ षटकांत १०२ धावा हव्या होत्या. ४.२ षटकांत बिनबाद ४० व ९ षटकांत २ बाद ६५ वरून, नील चंद्रात्रे व कौस्तुभ रेवगडेच्या भेदक फिरकीने एमसीएडब्ल्यूची जोरदार घसरगुंडी उडवली. १२.४ षटकांत ८ बाद ७२ व १५ षटकांत ९ बाद ७६ अशी उलट नाशिकच्याच निर्णायक विजयाची शक्यता निर्माण केली. मात्र, अखेरचे १६ वे षटक एमसीएडब्ल्यूच्या शेवटच्या जोडीने सावधगिरीने निर्धाव खेळून काढले. हॅटट्रिक थोडक्यात हुकलेल्या नाशिकच्या लेग स्पिनर कौस्तुभ रेवगडेने ५, तर डावखुरा मंदगती नील चंद्रात्रेने ३ बळी घेतले.

हेही वाचा:

The post नाशिकला विजयाची हुलकावणी; राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा appeared first on पुढारी.