Site icon

अवैध शस्त्रसाठा बाळगणारे पोलिसांच्या ताब्यात

नांदगाव; पुढारी वृत्तसेवा – अवैध शस्त्रसाठा सोबत घेउन फिरणाऱ्यांवरती नांदगाव पोलिसांनी कारवाई करत यातील शेख इरफान अंजुम पीर मोहम्मद, अफजल अहमद अशपक अहमद, अन्सारी मोहमद स्वलीम इस्तियाक अहमद तिघांवर नांदगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील कोंढार शिवारात संशयितरित्या एक कार फिरत असल्याचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांना गुप्त माहिती मिळाली असता. पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी आपल्या टीमसह तत्काळ घटनेच्या दिशेने रवाना झाले.

पोलिसांनी कारचा पाठलाग करून कोंढार शिवारात त्यांना पकडले. यावेळी गाडीची झडती घेतली असता यामध्ये ४३ इंच लांबीची बंदूक, ३० इंच लांबीचे बॅरेल, लाकडी बट, २३ जिवंत पातळी राऊंड, दोन रिकाम्या पुंगळ्या, लोखंडी कोयते, लोखंडी चाकू, कुऱ्हाड, काळ्या रंगाची दुर्बीण, सर्च लाईट इत्यादी हत्यारे साहित्य आढळून आले. आरोपींना ताब्यात घेऊन तपास केला असता, तपासात आरोपींच्या घरी देखील हत्यारे असल्याचे समजले. नांदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी मालेगाव येथील आरोपीच्या घरी झडती घेतली असता, त्या ठिकाणी देखील छऱ्याची बंदूक तिचे लोखंडी बॅरल २८ इंच लांब व लाकडी बट, यां सारखे हत्यारे सापडले.

या कारवाईसाठी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप,अप्पर पोलीस आधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलिस अधिकारी सोहेल शेख यांचे मार्गदर्शन लाभले.

या कारवाई मध्ये नांदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी, पोलीस उपनिरीक्षक संतोष बहाकर, सह पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे, पोलीस हवालदार विनायक जगताप अनिल शेरेकर नंदू चव्हाण विशाल गोसावी, मुदत सर शेख दत्तू सोनवणे, दीपक मुंढे, वन अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.

हेही वाचा :

The post अवैध शस्त्रसाठा बाळगणारे पोलिसांच्या ताब्यात appeared first on पुढारी.

Exit mobile version