Site icon

कांदा-बटाटा सहकारी संघाची निवडणूक बिनविरोध

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक जिल्हा कांदा-बटाटा उत्पादक सहकारी संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत सोमवारी (दि. १८) उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. निवडणूक रिंगणात उतरलेल्या ३३ उमेदवारांनी मनधरणीनंतर माघार घेतली. त्यामुळे संघाच्या १५ जागांसाठी १५ उमेदवार रिंगणात राहिल्याने निवडणूक बिनविरोध झाली.

जिल्हा कांदा-बटाटा उत्पादक सहकारी संघाच्या १५ जागांसाठी १०५ अर्ज दाखल झाले होते. निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा खैरनार यांच्या अध्यक्षतेखाली अर्जांची छाननी झाली. त्यात संस्था, सोसायटी गटातून सर्वाधिक २७ अर्ज बाद झाले होते. अवैध अर्ज ठरल्यानंतर रिंगणात ४८ उमेदवारांचे अर्ज शिल्लक होते. त्यात संस्था, सोसायटी गटात ७ जागांसाठी ९, वैयक्तिक सभासद गटात ३ जागांसाठी ६, महिला राखीव दोन जागांसाठी ७, अनु, जाती-जमाती गट १ जागेसाठी २, इतर मागासवर्गीय गट (ओबीसी) १ जागेसाठी १८, तर विशेष मागासवर्गीय गट (एनटी) 1 जागेसाठी ६ उमेदवार रिंगणात होते.

सोमवारी (दि. १८) माघारीच्या अंतिम दिवशी मनधरणीसाठी जोरदार प्रयत्न झाले. संघाचे नेते राजाराम धनवटे, रमेशचंद्र घुगे यांच्या उपस्थितीत बैठका सुरू होत्या. सर्वच प्रमुखांना निवडणूक बिनविरोध होण्यासाठी माघारी घेण्याकरिता मोठी कसरत करावी लागली.

बिनविरोध निवड झालेले उमेदवार

सोसायटी गट (७ जागा) : रमेशचंद्र घुगे, निवृत्ती महाले, विकास भुजाडे, बाळासाहेब वाघ, रमेश आबा पिंगळे, संजय पवार, लक्ष्मीकांत (मुन्नाशेठ) कोकाटे

वैयक्तिक सभासद गट (३ जागा) : राजाराम धनवटे, चंद्रकांत कोशिरे, बापूसाहेब कुंदे

ओबीसी गट (१ जागा) : रत्नाकर चुंभळे

अनुसूचित जाती-जमाती (१ जागा) : काशीनाथ हिरे

भटक्या जाती-विमुक्त जाती (१ जागा) : रामदास सानप

महिला राखीव (२ जागा) : रंजना घोरपडे, इंदूबाई गवळी

हेही वाचा :

The post कांदा-बटाटा सहकारी संघाची निवडणूक बिनविरोध appeared first on पुढारी.

Exit mobile version