Site icon

क्राईम वाढलं, टवाळखाेरांची थेट धिंड काढा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शहरातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता पालकमंत्री दादा भुसे यांनी पोलिस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत, टवाळखोरांची थेट धिंड काढा अशा सूचना दिल्या. येत्या आठवड्याभरात टवाळखोरांना धडा शिकवून त्यांच्या मुसक्या आवळा, असेही त्यांनी म्हटले. गेल्या महिनाभरात शहरात घडलेल्या गंभीर गुन्ह्यांवरून त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या या बैठकीसाठी पोलिस उपायुक्त मोनिका राउत, चंद्रकांत खांडवी, प्रशांत बछाव, जिल्हाधिकारी जलज शर्मा, शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री भुसे, यांनी शहरात रस्त्यावर पोलिसांनी दिसायला हवे, यासाठी पोलिसिंग वाढविण्याच्या सूचना केल्या. दामिनी पथक सक्रिय करून टवाळखोरांना धडा शिकवा, तसेच अवैध धंदे तातडीने बंद करून शहरात शांतता हवी, त्यासाठी सर्वोतोपरी यंत्रणा राबविण्याच्या सूचना दिल्या. येत्या आठ दिवसांत कायदा सुव्यवस्था सुरळीत झाली पाहिजे. शहरातील ब्लॅक स्पॉट शोधून कोंबिंग करून सराईत गुन्हेगार शोधून त्यांची कसून चौकशी करण्याची सूचना यावेळी केली आहे. जे दोषी व उपद्रवी असतील त्यांची धिंड काढण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

संशयतांवर मोक्का कारवाई प्रस्तावित करण्यात येत आहे. गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई कठोर करण्यात येईल.

– प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा

हेही वाचा:

The post क्राईम वाढलं, टवाळखाेरांची थेट धिंड काढा appeared first on पुढारी.

Exit mobile version