Site icon

घोरपड लिंगविक्री प्रकरणी तिघांना २ दिवसांची वनकोठडी

नाशिक पुढारी वृत्तसेवा- घोरपड लिंगविक्री प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तीघांना मनमाड न्यायालयाने दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे. मंगळवार (दि. २) रोजी मनमाड रेल्वे स्टेशन परिसरात बनावट ग्राहक बनुन तीन आरोपींना सीने स्टाईल पध्दतीने पाठलाग करुन जेरबंद केले होते. त्यांच्याकडे नर घोरपडीचे लिंगे-119, मोटरसायकल-2, मोबाईल-3 असा मुद्देमाल आढळला होता.

दरम्यान, आरोपी राजेंद्र भोसले, रुपेश भोसले, रॉकी चौहाण या तीघांना बुधवारी (दि. ३) मनमाड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 2 दिवसांची वन कोठडी सुनावली आहे. मनमाड रेल्वेस्टेशन परिसरात नर घोरपड या वन्यजीव प्राण्याची लिंगे विक्री करण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहीती वनविभागाला मिळाली होती. त्यानंतर मनमाड रेल्वे स्टेशन परिसरात बनावट ग्राहक बनुन तीन आरोपींना सीने स्टाईल पध्दतीने पाठलाग करुन जेरबंद केले आहे. याप्रकरणी वन्यजीव कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा :

The post घोरपड लिंगविक्री प्रकरणी तिघांना २ दिवसांची वनकोठडी appeared first on पुढारी.

Exit mobile version