जळगाव : गुलाबराव पाटलांना संजय राऊतांमुळेच मंत्रिपद मिळाले : संपर्कप्रमुख संजय सावंत

जळगाव

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील हे वेळोवेळी संजय राऊत यांच्यावर टीका करत आहेत. मात्र मंत्रीपद मिळवण्यासाठी त्यांनी किती वेळा संजय राऊत यांच दार ठोठावल आहे, हे गुलाबराव पाटील विसरले आहेत. आज खा. संजय राऊत यांच्यावर टीका करणारे गुलाबराव पाटील यांना मंत्री पद संजय राऊत यांनीच दिलं होतं असा गौप्यसफोट शिवसेना ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी केला आहे.

शिरसोली येथे शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने जिल्हा परिषद गट मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यामध्ये संजय सावंत यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना हा गौप्यस्फोट केला.

यावेळी व्यासपीठावर शिवसेना सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, जिल्हा संघटक गजानन मालपुरे, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, महिला आघाडी जिल्हाप्रमुख महानंदा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

देवीच्या डोक्यावर हात ठेवून सांगावं…

यावेळी बोलताना संजय सावंत म्हणाले की, मंत्री गुलाबराव पाटील हे वणीच्या सप्तशृंगी देवीचे उपासक आहेत. दर वाढदिवसाला ते नेहमीच त्या ठिकाणी दर्शनासाठी जातात. त्यांनी देवीच्या डोक्यावर हात ठेवून सांगावं की, मी संजय राऊत यांच्यामुळे मंत्री झालेलो नाही. असे आव्हान संजय सावंत यांनी गुलाबराव पाटील यांना दिले आहे.

यांची होती उपस्थिती…

मेळाव्यात विधानसभा संपर्कप्रमुख सचिन आसबे, युवा सेना जिल्हाप्रमुख निलेश चौधरी, विभागीय सचिव विराज कावडीया, विधानसभा क्षेत्र प्रमुख रमेश पाटील, धरणगाव तालुकाप्रमुख जयदीप पाटील, रुपाली शिवदे, महिला आघाडी तालुका प्रमुख विजय लाड, भागवत पाटील, मुरलीधर रघुवंशी, राहुल बोराडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब सोनवणे यांनी तर आभार शिवसेना तालुकाप्रमुख उमेश पाटील यांनी मानले.

हेही वाचा;

The post जळगाव : गुलाबराव पाटलांना संजय राऊतांमुळेच मंत्रिपद मिळाले : संपर्कप्रमुख संजय सावंत appeared first on पुढारी.