नाशिक : चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुक आखाड्यात ४४ उमेदवार रिंगणात

चांदवड, पुढारी वृत्तसेवा : चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एकूण १८ जागांसाठी होत असलेल्या पंचवार्षिक निवडणुकीच्या माघारीच्या शेवटच्या दिवशी एकूण १६१ प्राप्त अर्जांपैकी ११७ उमेदवारांनी माघार घेतली. यामुळे उर्वरित ४४ उमेदवार प्रत्यक्ष निवडणुकीस सामोरे जाणार असल्याची माहिती निडणूक निर्णय अधिकारी प्रदीप पाटील, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पाटील यांनी दिली.

चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या माघारीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत सत्ताधारी विरोधात महाविकास आघाडी यांच्यात प्रत्यक्ष लढत होणार असल्याचे दिसत आहे. सोसायटीच्या सर्वसाधारण ७ जागांसाठी कारभारी भाऊसाहेब आहेर, रघुनाथ मोहन आहेर, डॉ. आत्माराम पोपटराव कुंभार्डे, अनिल बाबुराव कोठुळे, पंढरीनाथ दामोदर खताळ, भगवान मारुती खताळ, डॉ. सयाजी नारायण गायकवाड, नितीन निवृत्ती गुंजाळ, निवृत्ती शंकर घुले, विजय पुंजाराम जाधव, सुखदेव दशरथ जाधव, योगेश विलासराव ढोमसे, रंगनाथ धोंडीराम थोरात, डॉ. राजेंद्र रामदास दवंडे, अनिल शहाजी पाटील, शांताराम सुभाष भवर, बिंटू पंढरीनाथ भोयटे व संपतराव भाऊसाहेब वक्टे आदी १८ उमेदवारात लढत होणार आहे.

महिला राखीवच्या दोन जागेसाठी वैशाली शामराव जाधव, गीता रावसाहेब झाल्टे, योगिता दिगंबर वाघ व मीना बापू शिरसाठ यांच्यात लढत होणार आहे. इतर मागास प्रवर्गाच्या एका जागेसाठी माजी आमदार शिरीषकुमार वसंतराव कोतवाल, सचिन सुरेश निकम व संपत भाऊराव वक्ते यांच्यात लढत होणार आहे. विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या एका जागेसाठी खंडेराव रंगनाथ आरतनूर व विक्रम भागवत मार्तंड यांच्यात लढत होणार आहे. ग्रामपंचायतीच्या दोन जागांसाठी नितीन रघुनाथ आहेर, नितीन विठ्ठलराव गांगुर्डे, संजय दगू जाधव व मनोज जगन शिंदे यांच्यात चौरंगी लढत होणार आहे.

आर्थिक दुर्बल घटकाच्या एका जागेसाठी निवृत्ती दत्तात्रेय घाटे, अनिल बाळासाहेब ठोके व गणेश रमेश निंबाळकर यांच्यात तिरंगी लढत रंगणार आहे. अनुसूचित जाती व जमातीच्या एका जागेसाठी दयानंद महादू अहिरे, भीमराव जयराम निरभवणे, वाल्मीक दिलीप वानखेडे व अशोक शिवाजी हिरे यांच्यात चौरंगी लढत होणार आहे. व्यापारी गटाच्या दोन जागेंसाठी सचिन मिश्रीलाल अग्रवाल, शरद पोपट कोतवाल, शिवाजी पंढरीनाथ ढगे व सुशील श्रीकांत पलोड यांच्यात लढत होणार आहे. हमाल व मापारी, तोलारी गटाच्या एका जागेसाठी प्रमोद दामोदर कर्हे व रवींद्र दौलत पवार यांच्यात दुरेंगी लढत रंगणार आहे.

The post नाशिक : चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुक आखाड्यात ४४ उमेदवार रिंगणात appeared first on पुढारी.