Site icon

पिंपळनेरला भरणार वनभाज्यांचे प्रदर्शन

पिंपळनेर : (जि.धुळे) पुढारी वृत्तसेवा ; कर्मवीर आ.मा.पाटील यांच्या 43 व्या पुण्यतिथीनिमित्त 8 व 9 जानेवारीला वनभाज्यांचे प्रदर्शन, कर्मवीर बंडू बापूजी गौरव पुरस्कारांचे वितरण व नवीन शैक्षणिक धोरणावर पुस्तक प्रकाशन, पारितोषिक वितरण कार्यक्रम होणार आहे.

येथील कै.आ.मा.पाटील पब्लिक एज्युकेशन सोसायटी संचलित इंदिरा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व श्रीमती मनकर्णाबाई विनायकराव मराठे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयातर्फे हा कार्यक्रम होणार आहे. हे कार्यक्रम सकाळी 9 वाजता इंदिरा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व बी.एड महाविद्यालयाच्या प्रांगणात होतील. यंदा कर्मवीर बंडू बापूजी गौरव पुरस्कारप्राप्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. होय.एन.मराठे, कर्मवीर या. आई पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे सेवानिवृत्त उपप्राचार्य डी.टी. पाटील, महाराष्ट्र माळी महासंघाच्या संचालिका विमल जगताप, जयभद्र बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या ज्योती त्रिवेदी देवरे यांना देण्यात येणार आहे. संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्रराव विनायक मराठे अध्यक्षस्थानी असतील नवीन शैक्षणिक धोरण 2020 या पुस्तकाचे प्रकाशन या वेळी होणार आहे. तसेच 9 जानेवारीला वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम होईल, अशी माहिती देण्यात आली. कार्यक्रमाची तयारी पूर्ण करण्यात आल्याची माहिती संयोजकांकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा

The post पिंपळनेरला भरणार वनभाज्यांचे प्रदर्शन appeared first on पुढारी.

Exit mobile version