Site icon

युवा महोत्सवासाठी नाशिकची निवड महाराष्ट्राला सुवर्णसंधी : मुख्यमंत्री

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी नाशिकची निवड झाल्याने महाराष्ट्राला सुवर्णसंधी मिळाली आहे. तेव्हा महोत्सवाच्या आयोजनात कुठलीही कमतरता भासू देऊ नका. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणारा हा महोत्सव यशस्वी करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. राज्यभरातील युवकांनी महाेत्सवात सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले.

मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे मंगळवारी (दि.२) मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला. बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, क्रीडामंत्री संजय बनसोडे, मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, क्रीडा विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता आदी उपस्थित होते. तर पालकमंत्री दादा भुसे व विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

मुख्यमंत्र्यांनी बैठकीत निवास, भोजनव्यवस्था, कार्यक्रमस्थळाबाबत आढावा घेतला गेला. महोत्सवासाठी करण्यात आलेले बोधचिन्ह, घोषवाक्याबाबत क्रीडा आयुक्त सुहास दिवसे यांनी सादरीकरण केले.

हेही वाचा :

The post युवा महोत्सवासाठी नाशिकची निवड महाराष्ट्राला सुवर्णसंधी : मुख्यमंत्री appeared first on पुढारी.

Exit mobile version