Site icon

‘हर घर राहुल, हर घर काँग्रेस’ उपक्रम प्रभावी ठरणार : रमेश चेन्निथला

नाशिक : पुढारी वृत्तसेवानाशिक शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने ‘हर घर राहुल, हर घर काँग्रेस’ हा उपक्रम भविष्यात प्रभावी ठरणार आहे. या माध्यमातून काँग्रेसचा विचार घराघरांपर्यंत पोहोचवता येईल तसेच नाशिकमध्ये येणाऱ्या खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रेचा चांगला प्रसार होईल, असा विश्वास काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र प्रभारी केरळचे माजी उपमुख्यमंत्री रमेश चेन्निथला यांनी व्यक्त केला.

धुळे येथे झालेल्या उत्तर महाराष्ट्र काँग्रेसच्या आढावा बैठकीत शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या उपक्रमाचे उद्घाटन चेन्निथला व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आले. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आगामी काळात होणाऱ्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीकरिता बूथनिहाय तयारी करावी, असे मार्गदर्शन आ. पटोले यांनी केले. बैठकीत नाशिक शहर काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. आकाश छाजेड यांनी शहर काँग्रेसच्या कामांचा तसेच आगामी काळात होणाऱ्या कार्यक्रमाची व बूथ यंत्रणा कशी राबवण्यात येईल याचा आढावा दिला. याप्रसंगी काँग्रेस विधिमंडळ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह राज्यातील पदाधिकारी, माजी मंत्री शोभा बच्छाव, प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, आ. हिरामण खोसकर, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष तुषार शेवाळे, प्रदेश सचिव राहुल दिवे, युवक अध्यक्ष स्वप्निल पाटील, नाशिक जिल्हा एनएसयूआयचे अध्यक्ष अल्तमश शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा :

The post 'हर घर राहुल, हर घर काँग्रेस' उपक्रम प्रभावी ठरणार : रमेश चेन्निथला appeared first on पुढारी.

Exit mobile version