अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे झाडे, विद्युत वाहिनी खांब कोसळले

नाशिक

दातली; पुढारी वृत्तसेवा : सिन्नर तालुक्यातील दातली परिसरात शनिवारी (दि.11) वळीव पावसाने विजांच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह हजेरी लावली. यामुळे नागरिकांना उकाड्यापासून तात्पुरता दिलासा मिळाला. दुपारी साडेचार वाजल्यापासून दाटलेल्या ढगांमुळे अंधारमय वातावरण झाले होते. साडे सात वाजता सुरू झालेल्या पावसाने सुमारे दीड तास धुव्वाधार हजेरी लावली. त्यानंतर काही वेळ गारा पडल्या.

दातली येथे शनिवारी आठवडी बाजार भरतो. अचानक आलेल्या पावसामुळे परिसरातील नागरिक व व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. वादळी वाऱ्याने ठिकठिकाणी झाडे, वीज खांबाचे पोल आणि वीजवाहक तारा तुटून पडल्या. दातली-माळवाडी रोडवर वीज वाहक पोल तसेच झाडे पडल्याने काही वेळ रस्ता बंद होता.

The post अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे झाडे, विद्युत वाहिनी खांब कोसळले appeared first on पुढारी.