![प्रल्हाद पाटील](https://d2n2y7fp2ncdvv.cloudfront.net/files/2023/07/16200945/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A6-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2.jpg)
निफाड: पुढारी वृत्तसेवा: निफाड सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन व ज्येष्ठ नेते प्रल्हाद पाटील तथा दादासाहेब कराड (वय 94) यांचे निफाड येथे आज (दि.१६) सायंकाळी निधन झाले. १९८० च्या कालखंडामध्ये शरद जोशी यांनी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून उभारलेल्या शेतकरी आंदोलनाला बळ देण्याचे काम प्रल्हाद पाटील- कराड यांनी केले होते.
साखर कारखान्याचे खासगीकरण करण्याची मोहीम सुरू झाल्यानंतर गोदकादवा हा राज्यातील पहिला खासगी सहकारी साखर कारखाना देखील उभारण्याचे श्रेय प्रल्हाद पाटील- कराड यांच्याकडे जाते. शिवसेना तालुकाप्रमुख सुधीर विलासराव कराड यांचे ते आजोबा होत.
प्रल्हाद पाटील यांचा अंत्यविधी सोमवारी (दि.१७) सकाळी ९ वाजता जळगाव (निफाड) स्मशानभूमीत होणार आहे. त्यांच्या पश्चात ६ मुले, २ मुली, सूना नातवंडे असा परिवार आहे.
हेही वाचा
- नाशिक जिल्ह्याला निधी कमी पडू देणार नाही : अजित पवार
- नाशिक : गर्द हिरवाईतून कोसळणारा दुगारवाडी धबधबा; धबधब्यापर्यंत कसे जाणार?
- नाशिक : डोंगरे वसतिगृह मैदानाला पोलिसांची तटबंदी
The post ज्येष्ठ नेते प्रल्हाद पाटील- कराड यांचे निधन appeared first on पुढारी.