धुळे : ‘एमसीए’च्या संचालकपदी धुळ्याचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांची निवड

धुळे; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या, पुणे (MCA) कार्यकारी मंडळाच्या त्रैवार्षिक निवडणुकीत धुळे शहराचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांची संचालक म्हणून निवड झाली. ते धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष तसेच धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आहेत. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या उत्तर महाराष्ट्र विभागातून राजवर्धन कदमबांडे तीन मते मिळवून विजयी झाले, तर जळगाव येथील जैन उद्योग समुहाचे अतुल जैन यांना दोन मते मिळाली.

उत्तर महाराष्ट्र विभागातून राजवर्धन कदमबांडे यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन, आमदार अमरीषभाई पटेल, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे रोहित पवार, धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन दीपक पटेल, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष विकास काकदकर, माजी अध्यक्ष अभय आपटे, सेक्रेटरी रियाज बागवान, धनपाल शहा नासिक, धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचेचे उपाध्यक्ष भुपेशभाई पटेल, प्रकाश पाटील, रजनिश निंबाळकर, कपिल वाडीले आदिंनी अभिनंदन केले आहे.

हेही वाचा

The post धुळे : 'एमसीए'च्या संचालकपदी धुळ्याचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांची निवड appeared first on पुढारी.