धुळे तालुक्यातल्या उर्वरित गावांचाही होणार जल जीवन मिशन आराखड्यात समावेश

धुळे www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

धुळे तालुक्यातील उर्वरित गावांचाही जल जीवन मिशन आराखड्यात समावेश करा, अशा आशयाची मागणी इंदुबाई भदाणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब भदाणे यांनी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली होती. त्यानुसार धुळे तालुक्यातील उर्वरित गावे जल जीवन मिशन आराखड्यात समाविष्ट करण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी जल जीवन मिशनच्या मिशन संचालकांना दिले. यामुळे सबंधीत गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

शासनाच्या जल जीवन मिशन अंतर्गत, धुळे तालुक्यातील काही गावांचा अजूनही समावेश झालेला नव्हता. संबंधितांनी भक्कम पाठपुरावा करूनही काही तांत्रिक कारणास्तव या योजनेत समावेशाबाबत दिरंगाई होत होती. सदर बाब इंदुबाई भदाणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब भदाणे यांच्या निदर्शनात आली. यासंदर्भात त्या-त्या गावातील ग्रामस्थ व पदाधिकार्‍यानीही बाळासाहेब भदाणे यांचेकडे याबाबत पाठपुरावा करण्याची मागणी केली होती. इंदुबाई भदाने प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब भदाणे यांनी याबाबत राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना वस्तूस्थिती लक्षात आणून दिली. सदर गावांचे समावेशाबाबत वस्तुस्थिती लक्षात आणून दिल्यानंतर व सदर गावांची पाण्याची निकड लक्षात घेऊन, धुळे तालुक्यातील या गावांचा जलजीवन मिशनमध्ये जल जीवन मिशनच्या आराखड्यामध्ये समावेश करावा अशा लेखी सूचना ना. गुलाबराव पाटील यांनी लागलेच दिल्या. जल जीवन मिशनच्या मिशन संचालकांना तशा आशयाचे आदेश दिल्याने सबंधित गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भविष्यात सुटणार आहे. या जल जीवन मिशन आराखड्यात धुळे तालुक्यातील अकलाड, धामणगाव, मोरदड, पुरमेपाडा, अंचाळे, बिलाडी, खंडलाय (बु.), खंडलाय (खु.), खेडे(एकलव्य), मोरशेवाडी, नगाव(वडेल), नांद्रे(प्रतिपाडा), निमगुळ, सडगाव, वडणे, बाभूळवाडी, नरव्हाळ, न्याहळोद, निमखेडी आदी गावांचा समावेश होणार आहे. इंदुबाई भदाणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब भदाणे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे, सदर गावांचा समावेश जल जीवन मिशनमध्ये होऊन या गावांचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

हेही वाचा:

The post धुळे तालुक्यातल्या उर्वरित गावांचाही होणार जल जीवन मिशन आराखड्यात समावेश appeared first on पुढारी.