
धुळे : पुढारी वृत्तसेवा
राज्यात सर्वत्र पशुधनावर लंपी आजाराचा प्रादुर्भाव झाला असून पशुपालनाचा व्यवसाय धोक्यात आला आहे. त्याअनुषंगाने धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील यांच्या पुढाकाराने बाजार समितीत आलेल्या पशुधनाला लंपी आजार होवू नये म्हणून लंपी प्रतिबंधात्मक मोफत लसीकरण करण्यात आले. तर आवारात फवारणीही करण्यात आली. दरम्यान धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत लंपी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून बाजाराच्या दिवशी दर मंगळवारी मोफत लसीकरण केले जाणार असल्याची माहिती सभापती बाजीराव पाटील यांनी दिली आहे.
पुढारी न्यूज – सॅटेलाईट चॅनल आजपासून लोकसेवेत
लंपी या जीवघेण्या आजारामुळे पशुपालनाचा व्यवसाय धोक्यात आला आहे. दरम्यान या आजारामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. शेतकर्यांचे पशुधन सुरक्षित रहावे, त्याला कोणत्याही आजाराची लागण होवू नये म्हणून लंपी प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून धुळे बाजार समितीत मोफत लसीकरण केले जावे अशा सूचना आ.कुणाल पाटील यांनी सभापती व त्यांच्या संचालक मंडळाला दिल्या. त्यामुळे सभापती बाजीराव पाटील यांच्या पुढाकाराने आणि जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकीत्सालय, धुळे यांच्याकडून आज धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत गाय,बैल,वासरे यांना मोफत लसीकरण करण्यात आले. दरम्यान त्याआधी सोडीयम होयड्रोक्लोराईडचीही फवारणी करण्यात आली आहे. तसेच बाजार समितीचे संचालक महादेव परदेशी यांच्या प्रयत्नातून संपूर्ण बाजार समितीत महानगरपालिकेतर्फे विविध साथरोग व डास निर्मूलनासाठीही फवारणी करण्यात आली. बाजार समिती पदाधिकारी व प्रशासनाकडून लंपी आजाराविषयी जनजागृती करण्यात येत आहे. त्यासाठी आवारात पत्रक वाटप करणे तसेच डिजीटल बॅनर लावून शेतकर्यांना माहिती दिली जात आहे. यावेळी सभापती बाजीराव पाटील, संचालक डॉ.संदिप पाटील,पशुधन विकास अधिकारी डॉ.निलेश ठाकूर, प्रभारी सचिव देवेंद्र पाटील,सहाय्यक सचिव विशाल आव्हाड,देवेंद्रसिंग सिसोदिया,कृष्णा पाटील,पशुधन पर्यवेक्षक चिन्मय सोनवणे,संदिप पाटील आदी उपस्थित होते. दरम्यान लंपी प्रतिबंधत्मक लसीकरण मोहिमेमुळे आ.कुणाल पाटील यांनी बाजार समितीच्या पदाधिकार्यांचे कौतुक केले आहे.
लक्षणे आणि काळजी-
लंपी आजाराची जनावरांवर विविध लक्षणे दिसून येतात. भरपूर ताप येणे, डोळ्यातून ,नाकातून चिकट स्त्राव, चारा-पाणी खाणे कमी किंवा बंद होणे,दुध कमी येणे, अंगावर गाठी येणे, जनावरांच्या पायावर,छातीवर,पोटावर सूज येणे अशी लक्षणे दिसून येतात. ही लक्षणे दिसून आल्यास पशुपालकांनी तत्काळ पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या सल्ल्याने लसीकरण करुन घ्यावे. बाधित जनावरे वेगळी ठेवणे, आजारी जनावरावर विषारी औषधाची फवारणी करु नये, त्वचेवरील जखमेवर औषधी मलम लावणे. लंपी आजाराची लक्षणे दिसून आल्यास पशुधन मालकाने तत्काळ पशुवैद्यकीय डॉक्टरांना कळवून उपचार करुन घ्यावेत अशी माहिती पशुधन विकास अधिकारी डॉ.निलेश ठाकूर यांनी दिली आहे.
दर मंगळवारी लसीकरण
लंपी प्रतिबंध आणि उपाययोजनेसाठी धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत बाजाराच्या दिवशी दर मंगळवारी पशुधनावर लसीकरण केले जाणार असल्याची माहिती सभापती बाजीराव पाटील यांनी दिली आहे. दरम्यान बाजार समितीच्या आवारात फीरुन सभापती पाटील हे पशुधनाला लसीकरण करुन घेण्याबाबत शेतकर्यांना आवाहन करीत असून स्वता शेतकर्यांची विचारपूस करीत आहेत. त्यामुळे शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
हेही वाचा :
- रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते! देहूगाव परिसरातील चित्र
- भीमाशंकर प्रशासनावर ‘व्हीआयपीं’मुळे ताण
- Hindenburg Report | अदानीनंतर हिंडेनबर्गचा ‘या’ ३५ वर्षाच्या रशियन अब्जाधिशावर केला गंभीर आरोप, जाणून घ्या प्रकरण
The post धुळे बाजार समितीत दर मंगळवारी मोफत लम्पी प्रतिबंधात्मक लसीकरण appeared first on पुढारी.