
धुळे : पुढारी वृत्तसेवा
धुळे तालुक्यातील मेहरगाव येथील युवकाचा गळा आवळून खून केल्याचा प्रकार शुक्रवारी, दि.1 उघडकीस आला आहे. मयत युवकासोबत काही तरुणांनी घटनास्थळाजवळच पार्टी केल्याची बाब प्राथमिक तपासात उघडकीस आली असून पोलीस मारेकऱ्यांना शोधण्यासाठी सक्रिय झाले आहेत.
मेहरगाव कडून कुसुंबा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या एका शाळेजवळ शुक्रवारी, दि.1 पहाटे अमोल विश्वास भामरे या तरुणाचा मृतदेह आढळून आला. नागरिकांनी तातडीने पोलिसांना याबाबत कळवले असता स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील व सोनगीर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील घटनास्थळी पोहोचले. पोलीस पथकाने प्राथमिक तपासानुसार अमोल भामरे यांच्या गळ्यावर लाल रंगाचा वळ आढळून आला. त्यानुसार त्याचा गळा आवळून खून केल्याची बाब स्पष्ट झाली. घटनास्थळाच्या जवळच मदयाच्या दोन बाटल्या तसेच बियरची एक बाटलीसह रिकामे ग्लास आढळून आले. त्यामुळे भामरे याला रात्री पार्टी केल्यानंतर ठार केले गेले असावे ,असा पोलिसांना संशय आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्याने पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. पोलीस पथक भामरे यांच्या मारेकऱ्यांना शोधण्यासाठी सक्रिय झाले आहेत.
हेही वाचा:
- दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली पीएमसी ठेवीदारांची याचिका
- Gujarat Assembly Election 2022 : फॅमिली असावी तर अशी! कुटुंबातील ६० जणांनी एकाचवेळी केलं मतदान
- नाशिक : मार्केट यार्डातून 50 क्विंटल मका चोरीला, भुरट्या चोरांचा सुळसुळाट
The post धुळे : मेहेरगावला युवकाचा गळा आवळुन खून appeared first on पुढारी.