जळगावात प्लास्टिक फॅक्टरीचे आगीत लाखो रुपयांचे नुकसान

जळगाव www.pudhari.news

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

शहरातील एमआयडीसीतील जी सेक्टरमधील आकाश प्लास्टिक फॅक्टरीमध्ये शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दोन ते अडीच तासांनंतर अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.

शहरातील अयोध्यानगर येथील रहिवासी खंडू किसन पवार यांची औद्योगिक वसाहतीतीत जी-७६ मध्ये आकाश प्लास्टिक नावाची फॅक्टरी आहे. या कंपनीमध्ये अचानक शॉर्टसर्किटमुळे आग लागली. काही क्षणात आगीने विक्राळ रूप धारण केले. फॅक्टरीमध्ये आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर कामगारांनी तत्काळ मनपाच्या अग्निशमन विभागाला संपर्क साधून घटनेची माहिती दिली. तर फॅक्टरीमध्ये आग लागल्याचे कळाल्यानंतर फॅक्टरीचे मालक खंडू पवार हेसुद्धा त्याठिकाणी पोहोचले. त्यांच्यासह इतर कामगारांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. साधारण दहा बंबांद्वारे आगीवर पाण्याचा मारा करण्यात आल्यानंतर दोन ते अडीच तासांच्या प्रयत्नानंतर अग्निशमन जवानांना आगीवर नियंत्रण मिळविण्यास यश आले. दरम्यान, या आगीमध्ये प्लास्टिक वेस्ट मटेरिअलसह ठिबक नळ्या आणि ठिबक नळ्या तयार करणाऱ्या दोन महागड्या मशिनी जळून खाक झाल्या. तसेच बाजूच्या एका कंपनीलासुद्धा आगीची झळ बसली असून, तेथील काही पत्रेदेखील जळाली आहेत.

हेही वाचा:

The post जळगावात प्लास्टिक फॅक्टरीचे आगीत लाखो रुपयांचे नुकसान appeared first on पुढारी.