
नांदगाव : पुढारी वृत्तसेवा
नांदगाव माणिकपुंज रोड लगत अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. कासारी शिवारात माणिकपुंज रोडलगत रामदास ईप्पर यांच्या मेंढ्याच्या वाड्याजवळ हा मृतदेह आढळून आला.
याबाबत कासारी येथील पोलीस पाटील प्रभाकर शिंगाडे यांनी पोलिसात खबर दिली असून पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. सदर इसमाचे अंदाजे वय ४२ वर्ष असून ओळख पटल्यास पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन नांदगाव पोलीसांनी केले आहे.
मृत्यूमुखी इसमाच्या अंगात फुल बाहीचा रेघा असलेला शर्ट, काळ्या रंगाची फुल पॅन्ट, सफेद रंगाची कोपरी, भगव्या रंगाचे उपरणे, लाल रंगाचा करदोडा आहे. या घटनेचा अधिक तपास पो. हा भास्कर बस्ते हे करीत आहे.
हेही वाचा :
- बीड : कला केंद्रातील नर्तिकेचा लॉजवर खून करून प्रेताची विल्हेवाट; आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
- Chandrayaan-3 mission: पुढील १४ दिवस चांद्रयान-३ काेणता अभ्यास करणार…
- अहमदनगर : नऊ टपर्यांवर तंबाखूजन्य पदार्थ जप्त
The post नांदगावला मृतदेह आढळल्याने खळबळ appeared first on पुढारी.