पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यातील 20 गावांमध्ये डिजिटल कॅम्प सुरू

डिजिटल कॅम्प www.pudhari.news

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा प्रशासन धुळे व ग्रामपंचायत काळंबा तसेच आगाखान समर्थन कार्यक्रम (भारत) पिंपळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने येथे डिजिटल कॅम्पचे आयोजन करण्यात आले.

या डिजिटल कॅम्पमध्ये आधार कार्ड नाव नोंदणी, नाव दुरुस्ती, आयुष्यमान भारत कार्ड, पॅन कार्ड आदी अपडेट व दुरुस्ती करण्यासाठी पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यातील 20 गावांमध्ये हा डिजिटल कॅम्प सुरू करण्यात आला आहे. या कॅम्पमध्ये नागरिकांचे कागदपत्रे व्यवस्थित हाताळून ते काढण्याचे काम संस्था करित आहे. यात गोरगरीब जनतेच्या  आर्थिक बचत होऊन त्यांना तालुक्याला जाण्याची गरज भासणार नाही. आगाखान संस्थेने नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन त्यांचे प्रोजेक्ट समन्वयक त्रिलोक गुप्ता, तुषार गायकवाड यांनी 20 गावांमध्ये या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यासाठी त्यांचे विभाग प्रमुख विजय ज्ञानेश, विष्णू भोसले, तानाजी मरूरे, सुनिता भोये आदी प्रयत्नशील आहेत. तसेच ग्रामपंचायतीचे सरपंच निलेश वसावे, पोलिस पाटील मनु कुंवर, ग्रामसेवक सी. बी. ठाकरे, सामाजिक कार्यकर्ते लाजरस राऊत हे मदत करित आहेत. या डिजिटल कॅम्पचा परिसरातील खेड्या पाड्यातील व वस्तीवरील ग्रामस्थ मोठ्या संख्येने आधार कार्ड आदी कागदपत्रे अपडेट करुन घेत आहेत.

हेही वाचा:

The post पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यातील 20 गावांमध्ये डिजिटल कॅम्प सुरू appeared first on पुढारी.