नाशिक : अभोण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक व शिपाई एसबीच्या जाळ्यात

लाचप्रकरण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अभोणा पोलिस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन जगन्नाथ शिंदे (३९) व पोलिस शिपाई कुमार गोविंद जाधव (४२) हे १० हजाराच्या लाच प्रकरणात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. या घटनेत दोघांनी लाच मागितली होती. त्यानंतर तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला ही गोष्ट सांगितल्यानंतर सापळा रचण्यात आला. त्यात लाच घेतांना शिपाई जाधव हे रंगेहाथ सापडले.

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या विरुद्ध अभोणा पोलीस स्टेशन येथे असलेल्या तक्रार अर्ज चौकशी मध्ये गुन्हा दाखल न करण्याच्या मोबादल्यात सहायक पोलीस निरीक्षक शिंदे व शिपाई जाधव यांनी तक्रारदार यांच्याकडे तड़जोडीअंती १० हजाराची लाचेची मागणी केली. त्यानंतर शिपाई जाधव यांनी अभोणा पोलीस स्टेशन येथे ती स्वीकारतांना एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : अभोण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक व शिपाई एसबीच्या जाळ्यात appeared first on पुढारी.