
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
इंग्लंड येथील कॅट शहरात इंटरनॅशनल फिल्ड असोसिएशनद्वारे आयोजित ‘वर्ल्ड इनडोअर आर्चरी चॅम्पियनशिप २०२३’ या आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या दोन्ही नातींचा डंका दिसून आला. माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या कन्या देविशा व तनिष्का यांनी स्पर्धेत चमकदार कामगिरी करत भारतासाठी सुवर्णपदकाची कमाई केली. त्यामुळे नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
इंग्लंडच्या मेडवे पार्क स्पोर्ट्स सेंटर, गिलिंगहॅम, केंट येथे गेल्या आठवड्यात पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत ३८ देशांतील ५६८ खेळाडू सहभागी झाले होते. देशातील १२ स्पर्धकांनी विविध वयोगटांत आणि वेगवेगळ्या धनुष्य प्रकारांत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. या स्पर्धेत देविशा भुजबळ हिने १९ वर्षांखालील कम्पाउंड बो गटात सुवर्णपदक आणि तनिष्का भुजबळ हिने १७ वर्षांखालील कम्पाऊंड बो गटात सुवर्णपदक मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उज्ज्वल केले आहे. त्या दोघीही भुजबळ नॉलेज सिटी एमईटी, मुंबई या विद्यालयाच्या विद्यार्थिनी आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन मिडवे केंटच्या महापौर जैन अल्डोस आणि टॉनी अल्डोस तसेच आंतरराष्ट्रीय फिल्ड आर्चरी असोसिएशनचे अध्यक्ष मार्टिन कोइनी, उपाध्यक्ष स्टिफन केंद्रिक, उपाध्यक्ष मेरिट फ्रायर, सचिव लेन एनिगवर्थ आणि इंग्लंड फिल्ड आर्चरी असोसिएशनचे अध्यक्ष डेव मुरे यांच्या हस्ते झाले होते.
हेही वाचा :
- खेलो इंडिया पदक विजेत्यांची लाखाची उड्डाणे; बक्षिसाच्या रकमेत यंदापासून भरीव वाढ
- Amruta Khanvilkar : अमृता खानविलकरने छोट्या चंद्राला दिल्या आभाळभर शुभेच्छा
- उपराष्ट्रपती, केंद्रीय मंत्र्याविरोधातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली
The post नाशिक : आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत भुजबळांच्या नातींचा डंका appeared first on पुढारी.