
नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा
नाशिक जिल्हा विधी सेवा समिती यांच्या मार्गदर्शनाखाली चांदवड तालुका विधी सेवा समिती व चांदवड तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात आयोजित मंगळवार (दि.2) रोजी राष्ट्रीय लोकअदालतीत न्याय चौकशी पूर्व आणि न्यायालयीन प्रलंबित प्रकरणांपैकी १७११ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यामध्ये तब्बल एक कोटी सात लाखांची वसूली करण्यात आल्याची माहिती न्यायाधीश पी. बी. जोशी यांनी दिली.
राष्ट्रीय लोकन्यायालयात पॅनलप्रमुख म्हणून दिवाणी न्यायाधीश पी. बी. जोशी यांनी काम पाहिले. पॅनल मेंबर म्हणून ॲड. प्रवीण कोतवाल यांनी काम पाहिले. राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये एकूण ६३४ दिवाणी व फौजदारी प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी २६ प्रकरणांमध्ये तडजोड झाल्याने निकाली काढण्यात आली. दंडरूपाने व बँक वसुली स्वरूपात ५७ लाख ७९ हजार २३५ रुपयांची वसुली करण्यात आली. तसेच २८५८ प्रीलिटिगेशन प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यामध्ये १६८५ प्रकरणे निकाली काढण्यात आली. ग्रामपंचायतीच्या १६१३, एमएसईबीचे ७, बँका आणि पतसंस्था यांचे १०, नगर परिषदेचे ५५ तडजोडीच्या निकाली प्रकरणांमध्ये एकूण ५० लाखांची रक्कम वसूल करण्यात आली. न्याय चौकशीपूर्व आणि न्यायालयीन प्रलंबित प्रकरणांमध्ये एकूण १७११ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून, त्यात एक कोटी ७ लाख रुपयांची वसुली करण्यात आली. लोकन्यायालयासाठी तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड. डी. एन. ठाकरे, ॲड. पी. डी. पवार, ॲड. बी. एम. ठाकरे, ॲड. व्ही. जी. आहेर, ॲड. आर. पी. ठाकरे, ॲड. एन. के. आहेर, ॲड. एस. ए. शेळके, ॲड. अन्वर पठाण तसेच सहायक तालुका विधी सेवा समितीचे सहायक अधीक्षक एस. व्ही. घुले, ए. एन. लभडे, विस्तार अधिकारी लोहार आदी उपस्थित होते.
हेही वाचा:
- Met Gala : मेट गालाच्या रेड कार्पेटवर प्रियांका राज! निक जोनाससोबत लक्षवेधी लूक
- Sharad Pawar News | शरद पवार यांच्या निवृत्तीची ‘ही’ आहेत ५ कारणे?
- शरद पवार यांच्या आत्मचरित्रावर देवेंद्र फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले…
The post नाशिक : आज झालेल्या लोकअदालतीत चांदवडला एक कोटींची वसुली appeared first on पुढारी.