नाशिक क्राईम : तलवार बागळल्या प्रकरणी एकास वर्षभर कारावास

न्यायालय www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

धारदार शस्त्र बागळल्या प्रकरणी गणेश बाळासाहेब चांगले (२८, रा. हनुमानवाडी, पंचवटी) याला वर्षभर कारावास आणि १२ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली. डिसेंबर २०१३ मध्ये त्याला शस्त्रांसह पकडले होते.

पंचवटी पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील हनुमानवाडी परिसरात दि. २ डिसेंबर २०१३ रोजी गणेशला त्याच्या राहत्या घरातून तलवार व कुकरीसह ताब्यात घेतले होते. त्याच्याविरोधात भारतीय हत्यार कायदा कलम, महाराष्ट्र पोलिस कायदा व पोलिस आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखेचे तत्कालीन निरीक्षक एस. डी. सानप यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार एस. वाय. पाठक यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकारी पक्षातर्फे ॲड. एस. एस. चितळकर यांनी कामकाज पाहिले. परिस्थितिजन्य पुरावे आणि साक्षीदारांमुळे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी प्रतिभा पाटील यांनी गणेशला शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोलिस अंमलदार पी. पी. गोसावी, व्ही. ए. नागरे यांनी कामकाज पाहिले.

हेही वाचा :

The post नाशिक क्राईम : तलवार बागळल्या प्रकरणी एकास वर्षभर कारावास appeared first on पुढारी.