नाशिक : श्वानास क्रुर वागणूक दिल्याने मालकाविरोधात गुन्हा

श्वान,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पाळीव श्वानास क्रुर वागणूक देत निष्काळजीपणा दाखवल्याने श्वान अपंग झाल्याने उपनगर पोलिस ठाण्यात श्वानाच्या मालकाविरोधात प्राण्यांचा छळ प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतिमा भरत सोमैय्या (रा. जैन भवन समोर, नाशिकरोड) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित केतन कांकरिया (३०, रा. जैन भवन समोर, नाशिकरोड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. प्रतिमा यांच्या फिर्यादीनुसार, केतन यांच्याकडे लॅब्रोडाेर जातीचा श्वान आहे. मात्र केतन हे त्या श्वानाची व्यवस्थित काळजी घेत नसल्याने श्वान सारखे भुंकत असे. श्वानाचा पिंजराही लहान असल्याने त्याच्या पाठीमागील पायांना इजा झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. वारंवार समजावूनही केतन यांनी श्वानाची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे नागरिकांनी शरण एज्युकेशन ॲड वेलफेअर सोसायटीच्या मदतीने पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी केतन यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक : श्वानास क्रुर वागणूक दिल्याने मालकाविरोधात गुन्हा appeared first on पुढारी.