नाशिक : अंजनेरी गडावर दर्शनासाठी आलेल्या हनुमान भक्ताचा मृत्यू

मृत्यू ,www.pudhari.news

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा

अंजनेरी गडावर हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने दर्शनासाठी आलेले अंजनेरीतील स्थानिक रहिवासी शिवराम मुरधीलर बदादे (वय 50) यांचा ह्दयविकाराने मृत्यू झाला. ग्रामस्थांनी त्यांना तातडीने गडाच्या खाली आणले. मात्र, तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती.

जिल्हयातील आणि बाहेरील हजारो भक्त बुधवारपासून गडावर आले होते. बदादे हेही भर उन्हात गडावर आलेले होते. परंतु तेथेच त्यांना त्रास झाला आणि मृत्यू ओढवला. परंतु टीव्ही चॅनलवर भाविक दरीत कोसळून मृत्यू झाल्याच्या वृत्ताने स्थानिक पोलिसांना प्रचंड त्रास झालाय गडावर गेलेल्या भक्तांचे मित्र आप्तेष्ट यांनी तातडीने त्र्यंबक पोलिस ठाण्याशी संपर्क साधत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिस निरीक्षक बिपीन शेवाळे यांनी वस्तुस्थिती स्पष्ट केली.

हेही वाचा : 

The post नाशिक : अंजनेरी गडावर दर्शनासाठी आलेल्या हनुमान भक्ताचा मृत्यू appeared first on पुढारी.