नाशिक क्राईम : नोकरीचे आमीष दाखवून युवा वर्गास लाखोंचा गंडा

नोकरीचे आमिष www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पार्ट टाईम जॉब, वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून भामट्यांनी शहरातील युवक-युवतीस सुमारे साडे सहा लाख रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पुढारी न्यूज – सॅटेलाईट चॅनल आजपासून लोकसेवेत

रवीना रमेश गोडसे (रा. संसरी लेन, देवळाली कॅम्प) यांच्या फिर्यादीनुसार, भामट्याने २ ते ४ मे दरम्यान ३ लाख ५१ हजार रुपयांचा गंडा घातला. रवीना यांना भामट्याने फोन करून पार्ट टाइम जॉबमार्फत पैसे कमविण्याचे आमीष दाखवले. कामाचा व्हिडिओ मोबाइलवर ऑनलाइन दाखवत भामट्यांनी रविना यांना वेगवेगळ्या शुल्काच्या नावे साडे तीन लाख रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांत व ऑनलाइन युपीआय खात्यांमध्ये जमा करण्यास सांगितले. मात्र पैसे दिल्यानंतर भामट्याने संपर्क तोडल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर रवीना यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्याचप्रमाणे लोकेश रविकांत दीक्षित (२५, रा. दिंडोरी रोड) यांनाही भामट्याने १० ते २७ मार्च दरम्यान, गंडा घातला. वर्क फ्रॉम होमचे आमीष दाखवून भामट्यांनी लोकेशला ३ लाख १९ हजार रुपये वेगवेगळ्या बँक खात्यात जमा करण्यास सांगितले. त्यानंतर भामट्याशी संपर्क न झाल्याने लोकेश यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यानुसार दोन्ही गुन्ह्यांत फसवणूक झालेल्यांशी संपर्क साधणाऱ्यांसह ज्यांच्या बँक ख‌ात्यात पैसे जमा झाले त्या बँक खातेधारकांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. याआधीही शहरातील नागरिकांना रोजगार देण्याचे आमीष दाखवून याचप्रकारे आर्थिक गंडा घातल्याचे प्रकार घडले आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक क्राईम : नोकरीचे आमीष दाखवून युवा वर्गास लाखोंचा गंडा appeared first on पुढारी.