नाशिक : चिमुरडीने खाऊच्या पैशातून केले वृद्धाश्रमात स्नेहभोजनाचे वाटप

renu www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
वाढदिवस साजरा करण्याच्या नाना पद्धती असल्या तरी सिडको येथील एका चिमुरडीने आपल्या वाढदिवसानिमित्त जमा केलेल्या खाऊच्या पैशातून वृद्धाश्रमात स्नेहभोजनाचे वाटप केले.

ना स्वार्थासाठी, ना राजकारणासाठी, देव, देश अन् धर्मासाठी हे ब्रीद वाक्य घेऊन कार्यरत असणारे आपलं किचनच्या सदस्य रोहिणी खंडारे यांच्याकडून त्यांची भाची रेणू खंडारे हिच्या वाढदिवसानिमित्त तपोवन येथील वृद्धाश्रमात स्नेहभोजनाचे वाटप करण्यात आले. जमा केलेल्या खाऊच्या पैशाचा सदुपयोग केल्याने रेणूवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. कार्यक्रम सुरळीत पार पडण्यासाठी अभिजित परदेशी, अनिकेत निकम, चेतन सोनवणे, शिवम तिवारी, सुवर्णा खंडारे, मुकेश खंडारे यांनी परिश्रम घेतले.

हेही वाचा:

The post नाशिक : चिमुरडीने खाऊच्या पैशातून केले वृद्धाश्रमात स्नेहभोजनाचे वाटप appeared first on पुढारी.