नाशिक : जेलरोडला स्पर्धा परीक्षेतील यशस्वी ४३ विद्यार्थ्यांचा सत्कार

नाशिकरोड www.pudhari.news

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

पैसा कमवा, तो कमविणे काहीच गैर नाही, पण तो कर्तृत्वाने मिळवायला हवा, गैरमार्गाने पैसा कमवू नका, कारण गैरमार्गाने कमविलेला पैसा गेला तर प्रचंड मनस्ताप सोसावा लागतो. असे आवाहन प्रसिध्द अर्थतज्ज्ञ डॉ. विनायकराव गोविलकर यांनी केले.

नाशिकरोड येथील अटल ज्ञान संकुल सभागृहात शुक्रवारी (दि.५) प्रसिध्द अर्थतज्ज्ञ डॉ. विनायकराव गोविलकर यांच्या हस्ते विविध स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर आयुर्वेद सेवा संघाचे अध्यक्ष अंबादास कुलकर्णी, आयोजक माजी नगरसेवक संभाजी मोरुस्कर, गजनान तीतरे, असावरी मोरुस्कर, विजया कंकरेज, पुष्पा पाडगावकर, सुहास अडसुर, मोहन पाडगावकर, एकनाथ कांकरेज आदी उपास्थित होते. प्रसिध्द अर्थतज्ज्ञ डॉ. विनायकराव गोविलकर पुढे म्हणाले की, पैसा मिळविणे गैर नाही, पण गैर मार्गाने पैसा मिळविणे नक्कीच गैर आहे. वेळ आल्यावर, शिक्षा मिळाल्यावर त्याची जाणीव होते ,असे गोविलकर यांनी सांगितले. प्रास्तविकेत माजी नगरसेवक संभाजी मोरुस्कर म्हणाले की, सामजिक कर्तव्य अन् जबादरी म्हणून अटल ज्ञान संकुलतर्फे राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक, सामाजिक उपक्रम राबविले आहे. २२ फेब्रुवारी २०१४ मध्ये नितीन गडकरी यांच्या हस्ते अटल ज्ञान संकुल अभ्यासिका सुरू केली. आजच्या घडीला संपूर्ण नाशिकरोड व परिसरातील पंचविस ते तीस खेड्यातील विद्यार्थी अभ्यासिकेचा उपभोग घेत असून विद्यार्थ्यांच्या पसंतीचे पहिले ठिकाण बनल्याचा अभिमान वाटतो असे संभाजी मोरुस्कर यांनी सांगितले. दरम्यान, उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज आणि गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन तसेच द्वीप प्रज्वलनाने कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. दरम्यान स्पर्धा परीक्षा पास करुन भूमिअभिलेख, महावितरण, जलसंपदा, रेल्वे, पोलीस आदी शासनाच्या विविध विभागात वर्ग दोनची पदे मिळविणाऱ्या यशस्वी ४३ विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. राजश्री कडलग यांनी सूत्रसंचलन केले. विजया कंकरेज यांनी आभार मानले.

क्षमता शोधा अन् जपा 
विद्यार्थ्यांनी आधी आपल्यातील क्षमता शोधायला हवी, तीच माहीत नसेल तर पुढे काय करायचे हे समजणार नाही, एकदा तुम्हाला तुमच्या मधील क्षमता समजली तर पुढे ध्येय निश्चित करता येते, एकदा क्षमता समजिली की ती जपायला अन् जोपासायला शिका, असा सल्ला गोविलकर यांनी दिला.

स्नेहल आडके www.pudhari.news
स्नेहल आडके

आपण मनाचा निश्चय करून ध्येय पूर्ततेसाठी दक्ष राहिले पाहिजे, अडचणी, समस्यांवर मात करुन कष्ट केले तर स्पर्धा परीक्षेत यश हमखास मिळते. – स्नेहल आडके, कनिष्ठ अभियंता, वर्ग दोन – जलसंपदा विभाग.

वेळेचे नियोजन करणे आवश्यक आहे. थोडा संयम देखील ठेवायला हवा, स्पर्धा परीक्षेसाठी मला घरच्यांनी एक वर्षाचीच मुदत दिली. पण जिद्द, चिकाटी अन् कुटुंबाचा भक्कम आधार , अटल ज्ञान संकुल अभ्यासीका यांच्यामुळे आज यशस्वी होऊ शकलो. – रोहीत गांगुर्डे , दहिवद, चांदवड.

हेही वाचा:

The post नाशिक : जेलरोडला स्पर्धा परीक्षेतील यशस्वी ४३ विद्यार्थ्यांचा सत्कार appeared first on पुढारी.