
चांदवड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील मुंबई-आग्रा महामार्गावरील मालसाणे शिवारातील सोग्रस फाटा येथे समोरील दुचाकीला पाठीमागच्या बाजूने टेम्पोने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात मालेगाव तालुक्यातील १० वर्षीय मुलगा ठार, तर दुचाकीचालक गंभीर जखमी झाला आहे.
मालेगाव तालुक्यातील एरंडगाव येथील समाधान शंकर सोनवणे व भावेश (१०) हे दुचाकीने (एमएच ०५ एई ४३६८) मुंबई-आग्रा महामार्गाने नाशिककडून चांदवडकडे येत होते. मालसाणे गावच्या शिवारातील सोग्रस फाट्यावर दुचाकी असताना पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या मालवाहू छोटा हत्तीवरील (जीजे. १५, ए. टी. ९१९७) चालकाचे नियंत्रण सुटून तिने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीच्या पाठीमागे बसलेला भावेश यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर समाधान सोनवणे हा गंभीर जखमी झाला असून, त्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर मालवाहू गाडीचा चालक घटनास्थळावरून पळून गेला आहे. या घटनेबाबत रमेश शंकर सोनवणे (६० एरंडगाव) यांनी वडनेरभैरव पोलिसांत फिर्याद दिल्याने मालवाहू टेम्पोचालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास वडनेरभैरवचे सहायक पोलिस निरीक्षक मयूर भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक माळी करीत आहेत.
हेही वाचा :
- वायू प्रदूषणाचा झटका : कोल्हापूरकरांचे आयुर्मान तीन वर्षांनी घटले
- लोकसभेच्या सर्व ४८ जागा जिंकणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
The post नाशिक : टेम्पोच्या धडकेत मुलगा ठार, दुचाकीस्वार गंभीर appeared first on पुढारी.