नाशिक : तो’ मृतदेह डॉक्टरचा अन् मृत्यू ‘या’ कारणामुळे

मृतदेह,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मुंबई-आग्रा महामार्गावरील विल्होळीत मृतदेह आढळला होता. सुरुवातीस घातपाताची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र शवविच्छेदन अहवालात या व्यक्तीचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे समोर आले असून, डॉ. राजेश पांडुरंग जोशी (रा. मनीषा बंगला, राजीवनगर, इंदिरानगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

डॉ. राजेश हे त्यांच्या ८० वर्षीय आईसाेबत राहात होते. साेमवारी (दि. २३) सकाळी 9.30 ते 10 वाजता मुंबई-आग्रा महामार्गावरील विल्हाेळीतील महामार्ग पाेलिस केंद्राजवळील खड्ड्यात डाॅ. जाेशी यांचा मृतदेह आढळला होता. ही माहिती स्थानिकांनी नाशिक तालुका पाेलिसांना कळविली. त्यानुसार पाेलिस निरीक्षक सारिका आहिरराव व पथकाने पाहणी करीत मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला होता. डाॅ. हेमंत घांगळे यांनी शवविच्छेदन केले असता, डॉ. जाेशी यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचे अहवालात सांगितले आहे. डॉ. जोशी यांच्या चेहऱ्यावर खरचटल्याच्या जखमा आढळल्याने त्यांचा घातपात झाल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र शवविच्छेदनात त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक : तो' मृतदेह डॉक्टरचा अन् मृत्यू 'या' कारणामुळे appeared first on पुढारी.