देवळा; पुढारी वृत्तसेवा : देवळा कळवण रोडवरील वाहनांच्या स्पेअर पार्ट दुकानाला शॉट सर्किटमुळे आग लागल्याची घटना आज (दि. २६) सायंकाळी घडली. या आगीत लाखो रुपयांचे सामान जळून खाक झाले. देवळा नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी अथक परिश्रम घेतले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आज (दि. २६) रात्री आठ वाजताच्या सुमारास देवळा कळवण रोडवर असलेल्या आबा शेवाळे यांच्या तुळजाई आटो मोबाईल्स ह्या दुकानाला शॉट सर्किटमुळे आग लागली. यामध्ये स्पेअर पार्ट, ऑइल, फर्निचर, कम्प्युटर, सीसीटीव्ही कॅमेरे, महत्त्वाचे कागदपत्रे आदी वस्तू जळून खाक झाले. घटनास्थळी देवळा नगरपंचायतीचा अग्निशमन बंब दाखल झाला. या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली. यावेळी परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.
दरम्यान आजूबाजूच्या लोकांनी मदतीसाठी धाव घेतली. या दुकानात ऑईल विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. या ऑईलमुळे आगीने रौद्ररूप घेतले. घटनास्थळी तलाठी उमेश गोप नारायण यांनी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केला. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे शेवाळे यांनी सांगितले असून, भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.
The post नाशिक : देवळा कळवण रोडवरील ऑटोमोबाईल स्पेअर पार्ट दुकानाला शॉट सर्किटमुळे आग appeared first on पुढारी.