नाशिक : पाथर्डी फाटा येथील ज्ञानेश्वरनगर परिसरात अपघात, सात वर्षीय बालक ठार

Road accident

इंदिरानगर; पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी फाटा येथील ज्ञानेश्वर नगर परिसरात चारचाकी व दुचाकीच्या धडकेत एका सात वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना आज (दि. १) घडली. सत्यम राहुल पाटील (वय ७) असे मृत बालकाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ इंदिरानगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

पाथर्डी फाटा येथील ज्ञानेश्वर नगर परिसरात रात्री १०.३० वाजताच्या सुमारास चारचाकी व दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यावेळी दुचाकीवर पुढे बसलेला बालक गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. सत्यम राहुल पाटील (वय ७) असे अपघातात मृत्यू झालेल्या बालकांचे नाव आहे. अपघातस्थळी स्थानिक नागरिकांनी मोठे गर्दी केली होती.

या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात तक्रार गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. वारंवार होत असलेल्या अपघातांमुळे तात्काळ या ठिकाणच्या मुख्य रस्त्यावर असलेले अतिक्रमण हटवण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

The post नाशिक : पाथर्डी फाटा येथील ज्ञानेश्वरनगर परिसरात अपघात, सात वर्षीय बालक ठार appeared first on पुढारी.