नाशिक : पिंपळस येथे कापसाची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात, वाहन चालक जखमी

Accident

निफाड; पुढारी वृत्तसेवा : निफाड तालुक्यातील पिंपळस येथे कापसाची वाहतूक करणारा माल ट्रक पुलाचा कठडा तोडून नाल्यात कोसळला. या अपघातात वाहन चालक गंभीर जखमी झाल्याने त्याला अधिक उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले.

याबाबत प्रत्यक्षदर्शी कडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, शनिवारी (दि 6) त्री आठ वाजेच्या सुमारास संभाजीनगरकडून नाशिककडे कापूस घेवून निघालेला गुजरात पासिंग चा लाल आयशर ट्रक पिंपलस गावा लगत रस्त्यावरील तीव्र वळणाचा अंदाज न आल्यामुळे चालकाचे वाहनावरील ताबा सुटल्याने पुलाचा कठडा तोडून पूलाखालील नाल्या मध्ये कोसळला. या अपघातामध्ये वाहन चालक गंभीर झालेला असून त्याला तातडीने निफाड येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्याच्यासोबत अजून कोणी होते की नाही हे समजू शकले नाही.

या ठिकाणी रस्त्यावर असलेल्या जीवघेण्या वळणामुळे आणि रात्रीच्या वेळेस समोरून येणाऱ्या वाहनांच्या तीव्र प्रखर प्रकाश झोतामुळे वारंवार अपघात घडत असतात असे या ठिकाणच्या नागरिकांचे म्हणणे आहे.

The post नाशिक : पिंपळस येथे कापसाची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात, वाहन चालक जखमी appeared first on पुढारी.