चांदवड; पुढारी वृत्तसेवा : ओव्हरटेक करण्याच्या नादात बसचालकाचे नियंत्रण सुटून समोरून येणार्या मालवाहू ट्रकला बसची जोरदार धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघातात बसमधील चारजण ठार, तर 34 प्रवासी गंभीर जखमी झाले.
मंगळवारी पहाटेच्या सुमारास जळगाव येथून निघालेली राज्य परिवहन महामंडळाची वसई अगाराची बस (एमएच 14, केक्यू 3631) भुसावळ-मालेगावमार्गे मुंबई-आग्रा महामार्गाने नाशिककडे जात असताना सकाळी साडेनऊच्या सुमारास चांदवड शहराजवळील आहेर वस्तीजवळ मालवाहू ट्रकला (ओडी 05, झेड 0045) ओव्हरटेक करत असताना चालकाचे नियंत्रण सुटून बसने ट्रकला डाव्या बाजूने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात बसचा पूर्णत: चुराडा झाला.