
कळवण; दुर्गादास देवरे : कोंबड्यांची शिकार करण्यासाठी गेलेला बिबट्या कोंबड्यांच्या खुराड्यातच अडकल्याची घटना नाशिकच्या कळवण तालुक्यातील नवी बेज शिवारात समोर आली.
परिसरात बिबट्याच्या गुरगुरणे व डरकाळ्या फोडणे सुरू होताच शेतकऱ्याने खुराड्याजवळ धाव घेतल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. शेतकऱ्यांनी प्रसंगावधान राखत खुराडा व्यवस्थित बंद करून वनखात्याला माहिती कळविली. वनाधिकारी व कर्मचाऱ्यांनी साधनसामुग्रीसह घटनास्थळ गाठत बिबट्याला बेशुद्ध केले आणि कोंबड्यांच्या खुराड्यातून मोठ्या पिंजऱ्यात स्थलांतरित करून जेरबंद केले. अंदाजे दीड वर्ष वयाच्या या बिबट्याच्या बछड्याला नैसर्गिक अधिवासात सोडणार असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.
हेही वाचा :
- ऊस कोणाला द्यायचा सभासद – शेतकरी ठरवतील : महसूलमंत्री विखे
- No Confidence Motion : ‘अविश्वासा’वर चर्चा घडवून विरोधकांनी केले स्वतःचेच ‘वस्त्रहरण’: मुख्यमंत्री शिंदे
- Mushroom mystery : मशरुम खाल्ल्याने तिघांचा मृत्यू; एकजण गंभीर
The post नाशिक : बिबट्या अडकला कोंबडीच्या खुराड्यात अन्... appeared first on पुढारी.