नाशिकमध्ये सावरकर गौरवयात्रा उत्साहात

सावरकर गौरव यात्रा,www.pudhari.news

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नाशिक पूर्व विधानसभा क्षेत्रातील आडगाव नाका येथील स्वा. सावरकर स्मारक ते पंचवटी कारंजा, अशी सावरकर गौरवयात्रा काढण्यात आली.

सावरकर स्मारक येथील सावरकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून श्रीफळ वाढवून या गौरवयात्रेचा प्रारंभ झाला. यात्रेमध्ये सावरकरप्रेमी नागरिकांनी भगव्या रंगाच्या मी सावरकर लिहिलेल्या टोप्या परिधान केल्या होत्या. यात्रामार्गामध्ये गुलाब फुलांच्या पाकळ्यांची उधळण करून रांगोळ्या काढून तसेच फटाके फोडत ठिकठिकाणी यात्रेचे स्वागत केले. भगवे ध्वज व भगव्या रंगाचे मफलर यात्रेतील सावरकरप्रेमी नागरिकांनी परिधान केले होते. विविध घोषणा देत सावरकरांचा जयजयकार करण्यात आला. यात्रेचा समारोप पंचवटी कारंजा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत झाला.

यात्रेमध्ये केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, आमदार ॲड. राहुल ढिकले, भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, बाळासाहेब सानप, भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, सुनील केदार, युवा मोर्चा अध्यक्ष अमित घुगे, तपोवन मंडल अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, पंचवटी मंडल अध्यक्ष ज्ञानेश्वर काकड, उत्तम उगले, महेश महंकाळे, सोमनाथ बोडके, दिगंबर धुमाळ, धनंजय माने, राहुल कुलकर्णी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा : 

The post नाशिकमध्ये सावरकर गौरवयात्रा उत्साहात appeared first on पुढारी.