नाशिक : आजपासून तीन दिवस महानुभाव संमेलन; मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती लाभणार

श्री चक्रधर स्वामी www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरात सोमवारपासून (दि.२९) भगवान श्री चक्रधर स्वामी अष्टशताब्दी जन्मोत्सव व अखिल भारतीय महानुभाव संमेलन आयोजित करण्यात आले आहे. गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृह येथील श्री चक्रधर नगरीत होणाऱ्या तीन दिवसीय संमेलनात विविध धार्मिक कार्यक्रमांचा समावेश असेल. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संमेलनास उपस्थिती लाभणार आहे.

आठ शतकापूर्वी श्री चक्रधर स्वामी यांनी आपल्या शिष्य आणि भक्तांना अनेक विषयावर निरूपण केले. सकाळ, दुपार, सायंकाळ असे त्रिकाळ हे निरूपण चालायचे. श्री चक्रधर स्वामी यांचे विचार श्री चक्रधर स्वामी यांचे विचार समाजातील सर्व स्तरांमध्ये पोहोचण्यासाठी महानुभाव पंथातील संत, महंत आजच्या काळात प्रयत्न करत आहेत. नाशिकमध्ये होणाऱ्या संमेलनाच्या माध्यमातून स्वामींचे अधिकधिक नागरिकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न असणार आहे. यानिमित्ताने भगवान श्री चक्रधर स्वामींच्या चरण स्पर्शाने पावन झालेल्या गंगा गोदावरीच्या नदीपात्रातील ‘ढगातळी आसन’ या स्थानावरील मंदिराचा उद्घाटन समारंभ पार पडणार आहे. संमेलनस्थळी चक्रधर नगरी येथे भव्य मंडप ऊभारण्यात आला आहे. संमेलनात तीन दिवस धर्मसभा, संत महंतांची मिरवणूक व शोभायात्रा, भजन, कीर्तन, कथाकथन, प्राचीन काव्यवाचन, कवी संमेलन व स्वामींच्या तत्त्वज्ञानावर चर्चा आणि मार्गदर्शन होणार आहे. संमेलनास संपूर्ण देशभरातून १ लाखांहून अधिक संत, महंत व भाविक सहभागी होतील. संमेलनात तीन दिवस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समारंभाचे मार्गदर्शक सुकेणेकर बाबा, चिरडे बाबा, कृष्णराज बाबा मराठे तसेच आयोजक माजी आमदार बाळासाहेब सानप, भाजपाचे नेते दिनकर पाटील, दत्ता गायकवाड, प्रकाश घुगे, प्रकाश नन्नावरे, प्रभाकर भोजने आदींसह समित्यांचे पदाधिकारी व सदस्य आणि जिल्हाभरातील भाविकांनी केले आहे.

संमेलनातील कार्यक्रमांची रुपरेषा अशी…

सोमवार (दि.२९) :- पहाटे भगवान श्री चक्रधर स्वामी मंगल स्थान व वस्त्र सर्मपण. सकाळी ९ ला ध्वजारोहण. ९.३० ला धर्मसभा, सकाळी ११.४५ वाजता स्वागत व दिपप्रज्वलन, दुपारी १२ ला जन्मोत्सव व पुष्पवृष्टी, दुपारी ४ ला कवी संमेलन व प्राचीन काव्यवाचन, रात्री ८ वाजता भजन, किर्तन, सांस्कृतिक कार्यक्रम.

मंगळवार (दि.३०) :- सकाळी ८ वाजता संत, महंत, भिक्षुक व वासनिकांची अपुर्व भेटकाळ. ९.३० ला धर्म सभा, दुपारी ३ वाजता डोंगरे वसतीगृह ते पंचवटी गोदाघाटापर्यंत मिरवणूक.

बुधवार (दि.३१) :- सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० धर्मसभा व ग्रंथप्रकाशन व निरोप.

मुख्यमत्री, उपमुख्यमंत्र्याची हजेरी : संमेलनात महानूभाव पंथातील प्रमुख आचार्य तथा महंत बिडकर बाबा, लोणारकर बाबा, खामणीकर बाबा, विद्धांस बाब, कारंजेकर बाबा व लासुरकर बाबा उपस्थित राहणार आहे. तर मंगळवारी (दि.३०) दुपारी दोन वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर बुधवारी (दि.३१) समारोपाच्या दिवशी सकाळी ११ ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहतील. या व्यतिरिक्त अन्य राज्य व केंद्रातील मंत्र्याची उपस्थिती लाभणार आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : आजपासून तीन दिवस महानुभाव संमेलन; मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती लाभणार appeared first on पुढारी.