नाशिक : महामार्ग बसस्थानकात शिवशाही अचानक पेटली

शिवशाही बस आगीच्या भक्ष्यस्थानी,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महामार्ग बसस्थानकात शिवशाही बसला अचानक आग लागल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. सुदैवाने या घटनेत कुणालाही इजा झाली नसून अग्निशमन दलाने घटनास्थळी पाेहाेचून आग आटाेक्यात आणली.

महामार्ग बसस्थानकातून माजीवाडा-बोरीवली येथे जाण्यासाठी शिवशाही बस (एमएच ०६ बीडब्ल्यू ११८७) निघाली होती. आग्रा राेडवरील गरवारे पाॅइंटजवळ पाेहाेचल्यानंतर बसचालक आर. एन. बोंद्रे यांना बसमध्ये बिघाड जाणवला. त्यामुळे त्यांनी एसटीच्या विभागीय कार्यालयाशी संपर्क करून दुसऱ्या बसची व्यवस्था केली व २४ प्रवाशांना पर्यायी बसने पुढे पाठवले. त्यानंतर चालकाने नादुरुस्त बस महामार्ग बसस्थानकात आणली व तेथून कार्यशाळेत नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, बसचे मागील टायर फुटून स्फाेट झाला. त्यामुळे धूर निघून बसच्या चाकाजवळ आग लागली. याची माहिती अग्निशमन दलाला मिळाल्यानंतर जवानांनी एक बंबासह दाखल हाेत आगीवर नियंत्रण मिळविले. शिवशाही बसचालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील प्रवाशांचा जीव वाचला.

हेही वाचा : 

The post नाशिक : महामार्ग बसस्थानकात शिवशाही अचानक पेटली appeared first on पुढारी.