नाशिक : बिवळ येथे दीराने केली भावजयीचा निघृण खून; संशयित आरोपी फरार

सुरगाणा; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील बिवळ येथे सख्या चुलत दीराने कु-हाडीचे घाव घालून भावजयीचा निघृण खून केल्याची घटना घडली. यातील संशयित आरोपी फरार झाला आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, फिर्यादी चंदर गावंडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, दुपारी अकरा वाजेच्या दरम्यान मयत यशोदा लक्ष्मण गावंडे (वय २६) ही विवाहिता राहत्या घरी स्वयपांक करीत असताना तेथे संशयित आरोपी दीर रमेश परशराम गावंडे हा हातात कु-हाड घेऊन आला. त्याने महिलेच्या डोक्यावर, मानेवर मागील बाजूस कु-हाडीचे सपासप चार वार, घाव घालत निघृण खून केली. चुलीजवळ रक्ताचा सडा पडला होता. कु-हाडीचे वर्मी घाव इतके खोलवर होते की, मेंदूला रक्त पुरवठा करणा-या रक्तवाहिन्या पुर्णपणे तुटल्याने रक्त शरीरातून निघून गेल्याने जागेवरच मृत्यू झाला होता. ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषित केले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता आरोपीच्या चपला, गुन्ह्यात वापरलेली कु-हाड ताब्यात घेत पंचनामा केला आहे. विवाहितेस एक दोन महिन्याचे अपत्य आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मात्र खूनाचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही संशयित आरोपी फरार झाला असून पोलीस निरीक्षक संदीप कोळी कसून तपास करीत आहेत.

The post नाशिक : बिवळ येथे दीराने केली भावजयीचा निघृण खून; संशयित आरोपी फरार appeared first on पुढारी.