नाशिक : ‘आरटीई’ प्रवेश निश्चितीला आता आठ मेपर्यंत मुदतवाढ

आरटीई ची सोमवारी लॉटरी,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आरटीई प्रवेश प्रक्रिये अंतर्गत लॉटरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश निश्चितीची प्रक्रिया अतिशय संथगतीने सुरू आहे. पालकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने प्रवेशप्रक्रिया लांबली असून, अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी आहे. त्या पार्श्वभूमीवर आरटीई प्रवेशासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार येत्या 8 मेपर्यंत विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करणार येणार आहे. मुदतवाढ मिळाल्याने पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत राज्यातील आठ हजार 823 खासगी शाळांमधील एक लाख 1 हजार 846 जागांसाठी प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. लॉटरीत 94 हजार 700 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी 14 हजार 335 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. तर अद्यापही 87 हजार 511 जागा रिक्त आहेत. एकट्या नाशिक जिल्ह्यात सोमवारी (दि.24) सायंकाळपर्यंत 700 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असून, चार हजार 154 जागा शिल्लक आहेत.    दर   म्यान, आरटीई 25 टक्के प्रवेश पोर्टलवर अतिरिक्त भार येत असल्याने पालकांना तांत्रिक अडचणी येत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे पालकांनी प्रवेशप्रक्रियेबाबत कोणतीही भीती अथवा संभ्रम बाळगू नये. तसेच ज्या बालकांची प्रवेशासाठी सोडत (लॉटरी)द्वारे निवड झाली आहे, अशा बालकांना शाळा प्रवेशासाठी पुरेसा कालावधी देण्यात येईल, असे प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : ‘आरटीई’ प्रवेश निश्चितीला आता आठ मेपर्यंत मुदतवाढ appeared first on पुढारी.