नाशिक : येवल्यातील बालकाला चिरडणाऱ्या ट्रॅक्टरचालकास अटक

येवला; पुढारी वृत्तसेवा : येवल्यात घराजवळील गार्डनमध्ये खेळणाऱ्या बालकाला चिरडणाऱ्या ट्रॅक्टरचालकास गुरूवारी (दि.३०) अटक करण्यात आली. रुद्र समाधान पागिरे (वय ५) असे मृत बालकाचे नाव असून याप्रकरणी सागर दिलीप परदेशी या ट्रॅक्टरचालकास पोलिसांनी ताब्यात घेतले.

याबाबत अधिक माहिती अशी, येवल्यात घराजवळील गार्डनमध्ये खेळण्यासाठी जात असताना रुद्र या चिमुरड्याला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला होता. अपघातानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रुद्रला तसाच सोडून निर्दयी वाहन चालकाने पळ काढला होता. त्यानंतर याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू होता. सागर परदेशी याच्या (MH30 F 8267) ट्रॅक्टरच्या चाकाखाली बालकाचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार येवला शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या पथकाने या ट्रक्टरचालकास ताब्यात घेतले.

हेही वाचा :